पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/187

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आता मागे पडलं आहे. 'बोलणा-याची माती विकते, न बोलणारा पदरी मोती असून मोती विकू शकत नाही' हे वास्तव आहे. शब्द सोन्याचा पिंपळ होतो आहे. साहित्य, कला, संगीत, जाहिरात क्षेत्रात शब्द मोजून मोल ठरते. त्यामुळे बी. ए., एम. ए., बी.कॉम., एम.कॉम., बी.बी.ए., एम.बी.ए., बी.जे.सी., एम.जे.सी., बी.सी.ए., एम.सी.ए., बी.पीएड., एम.पीएड., बी.एड., एम.एड., जी.डी.आर्ट या पदव्या संपादन करणा-यांना आता भाषेच्या अधिकार, सामर्थ्य, ज्ञान, कौशल्य, उपयोजन इ. च्या आधारावर जीवनातील नव नवी क्षितिजे खुणावत आहेत व या क्षेत्रात डॉक्टर, इंजीनिअरपेक्षा अधिक प्रतिष्ठा, प्रसिद्धी, पैसे मिळतात हे आपण रोज पहात आहोत.
शिक्षक/प्राध्यापक
 आज मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कन्नड, तमीळ, गुजराथी इ. भाषातून आपणास पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यासोबत शिक्षणशास्त्रातील पदविका अथवा पदवी संपादून शिक्षक, प्राध्यापक होता येते. तुम्ही विनाअनुदानित अथवा अनुदानित अशा कोणत्याही संस्थेत शिक्षक, प्राध्यापक झालात की रु. २५,000 ते रु. १ लाख इतकं मासिक वेतन शासनमान्य श्रेणीनुसार मिळवू शकता. महाराष्ट्र राज्याच्या समाज मानसात पैशापेक्षा शिक्षकाची प्रतिष्ठा मोठी आहे. मी प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, प्राध्यापक, विद्यापीठीय शिक्षक, संशोधन मार्गदर्शक, प्राचार्य अशी सतत नव नवी पदे संपादत माझे जीवन यशस्वी व समृद्ध करू शकलो. माझे निवृत्ती वेतनच रु. ४0,000 आहे. यावरून शिक्षण क्षेत्रातील संधी आपले जीवन यशस्वी करू शकतात यावर तुमचा विश्वास बसावा. समाजमनात या पदाची प्रतिष्ठा इतकी मोठी की विद्यार्थी कुठेही भेटोत लवून नमस्कार करतात. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुमचे विद्यार्थी तुम्हास आदराने साहाय्य करण्यास तत्पर असतात. मला बसमध्ये कधी उभे राहून प्रवास करण्याची वळ येत नाही. कोणीतरी पालक, विद्यार्थी दत्त असतात. स्वतः उभे राहतात. मला बसवतात. यापेक्षा या क्षितिजाचे कवेत न येणारे टोक कोणते?
साहित्यिक/समीक्षक

 ललित लेखन हे भाषा प्रभुत्वाशिवाय करता येत नाही. तुम्ही भाषेतील उच्च शिक्षण संपादन केलं असेल तर अधिक प्रतिभासंपन्न लेखन करू शकता. मराठीत जे लेखक झाले त्यांना नि त्यांच्या वारसांना आज लाखो

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१८६