पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/176

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

also my family, my country, my people, the benefit will many" इथियोपियाच्या मेडा बॅगटोल नावाच्या शाळकरी मुलीच्या वाक्याने सुरू होणारी ही पुस्तिका आरंभीच मुलींच्या शिक्षणाचा उद्देश व महत्त्व रेखांकित करते. तिचे हे वाक्य मला आज मलाला युसाफझाई (Malala yousafzai) या अशाच शाळकरी मुलीची आठवण करून देते. तिनं मुलींच्या शिक्षणाच्या हक्काबद्दल तालिबानी दहशतवाद्यांना प्रश्न केला होता की, 'कुराण कुठे सांगते की मुलींनी शिकू नये.' पाकिस्तानच्या या शाळकरी मुलीवर तालिबानी दहशतवाद्यांनी जीवघेणा हल्ला करत दोन गोळ्या झाडूनही तिला जागतिक प्रयत्नांनी इंग्लंडमध्ये उपचार करून वाचवण्यात आले.
 मुलींचे शिक्षण हा आज जागतिक मानवाधिकार मानण्यात आला आहे. तरी जगातील सुमारे ७५ देशांतून अद्याप ५८ दशलक्ष मुली शिक्षणापासून पूर्णतः वंचित आहेत. त्यामुळे त्या वेळी (२००५ साली) सर्व मुला-मुलींना शाळेत दाखल करण्याचे धोरण जगाने निश्चित केले होते. भारताची सन २०११ ची जनगणना आपणास सांगते की भारतात साक्षरतेचे प्रमाण ७४% आहे. त्यात निरक्षर मुलींचे प्रमाण मोठे आहे. त्या अहवालात मुलींच्या शिक्षणावर होणाच्या खर्चाची दरी कमी करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. सध्या आपण १२ वी पंचवार्षिक योजना राबवत आहोत. या योजनेत मुलींच्या शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी गेल्या योजनेत प्राथमिक शिक्षण विकासार्थ राबवलेल्या सर्व शिक्षा अभियानाच्या धर्तीवर ‘राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान' राबवले जायचे असून त्यात मुलींच्या शिक्षण समावेशास प्राधान्य देण्यात आले आहे.

 मुलीच्या शिक्षणाचा तो अहवाल. पण मुलींचे शिक्षण ही किती व्यापक संकल्पना आहे ते अहवाल वाचताना लक्षात येते. तो अहवाल असं सांगतो की मुलींचं शिक्षण तिच्या जन्माच्या क्षणी सुरू होते. म्हणून त्या अहवालात पुरुषांपेक्षा स्त्रीस एक वर्ष जादा शिकवण्याची शिफारस होती. त्याचे कारण दिले होते की मुलींचे शिक्षण वाढणे म्हणजे समाजात एका वर्षात तिची पत नि किंमत २०% वाढवणे. तिचं उत्पन्नही त्याचं प्रमाणात वाढते. आई जर शिक्षित असेल तर ती बाळाचा सांभाळ अधिक सुजाण पद्धतीने करते. त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण कमी होते. रोगराई कमी होते. देशाचे बाल्य सुदृढ होते. मुलांचा आहार समतोल होतो. उपचार वेळेत होतात. आईला बालमानसशास्त्र समजू लागल्याने ती मुलांचे मन ओळखते. तेही अधिक प्रगल्भपणे. ती बाळाच्या लसीकरणाबाबत दक्ष असते. यासाठी समान

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१७५