पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकविसाव्या शतकातील पालक व मुलांचे प्रश्न

जागतिकीकरणाची पार्श्वभूमी

 जागतिकीकरण ही एक आंतरराष्ट्रीय एकीकरणाची प्रक्रिया आहे. दूरवर पसरलेल्या अफाट जगातील मानव समुदायात एकमेकांशी संपर्क, दळणवळण आणि देवघेवीची परंपरा जुनी आहे. इसवी सनाच्या पंधराव्या शतकापासूनचा इतिहास पाहता असे लक्षात येते की आशिया, आफ्रिका आणि युरोपमध्ये रेशीम व्यापार होता. तो एका विशिष्ट मार्गाने व्हायचा. तो मार्ग रेशीम मार्ग (Silk Road) म्हणून इतिहासात ओळखला जातो. पंधराव्या शतकात जागतिक समुद्राचे भान माणसास आले ते समुद्र पर्यटनामुळे. स्थूलमानाने सातासमुद्रापलीकडील जगाचा शोध माणसास लागला. त्यातून माणसाने अमेरिकेचा शोध लावला. एकोणिसाव्या शतकातील वाफेच्या इंजिनाच्या शोधामुळे कोळसा व वाफेवर चालणारी जहाजे अस्तित्वात आली. त्यामुळे जगप्रवास शक्य झाला. रस्तेबांधणीस गती आली. पुढे विसाव्या शतकात तार आणि टेलिफोनच्या शोधामुळे घरबसल्या जगाशी संपर्क करण्याची किमया माणसाने करून दाखवली. रेल्वे, मोटार, विमान, सायकल, स्कूटर इ. शोधांमुळे माणसाचे दैनंदिन जीवन गतिमान झाले. त्याच चलनवलन वाढले. या शतकाच्या उत्तरार्धात संगणक, इंटरनेट, मोबाइलचा शोध, प्रचार व प्रसारामुळे जग खन्या अर्थाने एक झाले ते वेळ व अंतराचे गणित शून्यावर येऊन ठेपल्यामुळे. यातून पूर्व संकल्पनांना विराम मिळाला. माणसास जग सपाट वाटू लागले. थॉमस फ्रिडमनने सन २००५ मध्ये 'The world is Flat : A Brief History of Twenty First century' नावाचं पुस्तक लिहिले. सलग तीन वर्षं त्याच्या आवृत्तीत सुधारण्यात आल्या. हे शीर्षक इन्फोसिसचे

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१०१