पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रचलित पाठ्यक्रमात धर्म, नीती शिक्षणाच्या स्वरूपात दिसून येतात. विशेषतः फ्रेंच राज्यक्रांतीतून निर्माण झालेल्या स्वातंत्र्य, समानता, बंधुता या तत्त्वांचा सर्वत्र अंगीकार करण्यात आला; त्यामुळे महायुद्धपूर्व काळातील अमीर उमरावांच्या मुलांसाठी असलेल्या शिक्षणाचे स्वरूप बदलणे आवश्यकच नाही तर अनिवार्य झाले. सर्वांना समान शिक्षणाचे तत्त्व सर्वत्र प्रचलित झालं. शिक्षणात स्त्रियांचा प्रथमच अंतर्भाव झाल्याने त्यांच्या आशा-आकांक्षा, गरजांचे प्रतिबिंब शिक्षणव्यवस्थेत पडणं आवश्यक झाले. सन १९६० ते ७० या दशकात युरोपातील जवळ-जवळ सर्वच देशांत क्रांतिकारी बदल घडून येऊन नवा आकृतिबंध स्वीकारला गेला. त्याचं स्थूलमानाने स्वरूप खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले.

क्र. शिक्षण स्तर वयोगट अवधी शिक्षणाचे स्वरूप
पूर्व प्राथमिक स्तर  ३ ते ५ वर्षे २ वर्षे  भाषिक कौशल्य, सामाजिकीकरण
प्राथमिक ६ ते ११ वर्षे ५ वर्षे भाषिक कौशल्य, धर्मशिक्षण, संस्कृती विकास
पूर्व प्राथमिक १२ ते १६ वर्षे ४ वर्षे विज्ञान, समाजवाद, धर्मनिरपेक्षता
माध्यमिक १७ ते १९ वर्षे ३ वर्षे व्यावसायिक/तांत्रिक
उच्च माध्यमिक २० ते २१ वर्षे   २ वर्षे व्यावसायिक प्रावीण्य/शारीरिक/लष्करी
विद्यापीठीय २२ ते २३ वर्षे २ वर्षे विशिष्ट विषयातील प्रावीण्य/कार्यानुभव
संशोधन २४ ते २५ वर्षे २ वर्षे प्रबंध लेखन/प्रयोग/चिकित्सा

 याशिवाय निरंतर शिक्षणांतर्गत अनेक छोटे-मोठे पाठ्यक्रम सर्वत्र प्रचलित

एकविसाव्या शतकातील शिक्षण/९०