पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ‘विनाअनुदान शिक्षणाचे धोरण' भारतातील शैक्षणिक अराजकाचे मूळ होय. अन् आता तर खासगीकरण, जागतिकिकरण, उदारीकरण, विदेशी संस्था व विद्यापीठांचे आगमन यामुळे एक नवी अनिर्बध व्यवस्था मूळ धरू पाहता आहे. शिक्षण संस्थांतील आगमन यामुळे एक नवी अनिर्बध व्यवस्था मूळ धरू पाहात आहे. शिक्षण संस्थांतील किमान भौतिक सुविधा, शिक्षकांची किमान पात्रता, शिक्षकांचे किमान वेतन याबाबत निश्चित व कणखर धोरण नसल्याने शिक्षणाचा दर्जा रोज खालावतो आहे. शिक्षण गुणवत्ता व शिक्षण खर्च यांचे विषम प्रमाण लक्षात घेता, गुणवत्तेची शाश्वती देणारी व्यवस्थाच उरली नाही अशी स्थिती आहे. शिक्षण विकासातून अंग काढून घेण्याचे शासनाचे धोरण म्हणजे कल्याणकारी राज्य (Welfare State) संकल्पना सरळसरळ नाकारण्यासारखे आहे. एकेकाळी भारतातील शिक्षण हे समाजशिक्षण (Mass Education) होते, ते आता विशिष्ट वर्गाचे हित जपणारे (Class Education) झाले आहे. धनदांडग्यांनी शिकावे व गरिबाने निरक्षरच राहावे, अशी व्यवस्था रुजत आहे.
 यातून शिक्षणसंस्था ‘संस्थाने' व शिक्षक संस्थाचालक ‘संस्थानिक' होत आहेत. सामाजिक पैशावर व्यक्तिगत संपत्ती, सत्ता व प्रतिष्ठा मिळविण्याचे साधन म्हणून शिक्षण संस्था स्थापन होतात. त्या बहुधा राजकारण्यांच्याच असतात. संस्था संचालनात चालक पदरमोड करतात असे दिसत नाही. उलटपक्षी शाळांतून खडूसाठी मासिक वर्गणी, संस्थाचालकांचा गौरव समारंभ, लग्न इत्यादींसाठी मासिक पगारातून रक्कम वसुली, शिक्षण अधिका-यांच्या निरीक्षण, नियुक्ती, पदनिश्चितीसाठी लाच, शिक्षक नियुक्तीच्या वेळी देणगी यांना आता ‘रिवाज' म्हणून समाजमान्यता लाभते आहे. यातून 'तेरी भी चूप, मेरी भी चूप' अशी भूमिगत अशांती पसरत आहे. शिक्षकांना वेतन अध्यापनासाठी न राहता ‘वेळेवर जाणे-येणे करून मस्टरवर सही करण्यासाठी होते आहे. संस्थाचालक, मुख्याध्यापक, प्राचार्य, अधिकारी यांना धरले की विद्यार्थी पालक वाच्यावर उडाले तरी चालतात, अशी बेफिकिरी या देशात गुणवत्तेचं कोणते आश्वासन देणार?
 ‘शिक्षण कशासाठी' याचे उत्तर पालकांनीच ठरवून रूढ केले आहे. त्यांना आपली मुले रेसकोर्समधील घोडे' व्हावेत असे वाटते. रेसकोर्सच्या घोड्याने जॅकपॉट, डर्बी जिंकावी असे वाटणाच्या मालकाप्रमाणे पालकांना आपला पाल्य प्रत्येक परीक्षेत प्रथम क्रमांकानेच उत्तीर्ण व्हावा असे वाटते. 'वाटणे' आणि ‘असणे' यांतील ‘क्षमतांना पालकांनी जमिनीवर पाय ठेवून समजून घेण्याची गरज आहे. पैकीच्या पैकी मार्काच्या आग्रहामुळे विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्तीचा विकास होतो खरा; पण त्यांचे व्यक्तिमत्त्व आकसते, एकारते