पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/58

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण या शिक्षणामुळे ती पूर्णांशाने सुशिक्षित व स्वावलंबी झाली असे म्हणणे धाडसाचे ठरेल. शासकीय आकडेवारी काही सांगत असली तरी लघुउद्योगात बालकामगारांची संख्या, बालभिक्षेकरी, बालगुन्हेगार नि संस्थांतील संगोपन कालावधीनंतर निराधार नि बेकार होऊन नोकरीच्या शोधात वणवण फिरणारी मुले, विवाहाशिवाय तरणोपाय न राहिलेल्या मुली, संगोपन कालावधीनंतर वाममार्गी व वासनेच्या शिकार झालेल्या युवती पाहिल्या की वस्तुस्थिती वेगळी सांगायची गरज उरत नाही. समाजातील शहारे आणणारे हे चित्र वंचित बालकांच्या शिक्षणाकडे केलेल्या दुर्लक्षाचे परिणाम नाही तर काय?
 भारतीय सामाजिक व शैक्षणिक जीवनात प्राचीन काळापासून बालकास असाधारण असे महत्त्व देण्यात आले आहे. उपनिषद काळातही बालकाचे महत्त्व असाधारण होते. 'पुत्रप्राप्तीशिवाय मोक्ष नाही' असे सांगणारे भारतीय तत्त्वज्ञान बालकांविषयीच्या अदम्य आस्थेच प्रतीक म्हणावे लागेल. सामाजिक जीवनात बालकांचा दोन प्रकारे विचार करावा लागतो; कारण बालकांचे सामाजिकदृष्ट्या मुख्यतः दोन प्रकार असतात. १) सामान्य बालक २) असामान्य बालक, बालकांच्या शिक्षणविषयक प्रक्रियेचा अभ्यास करताना सर्वसाधारणतः आपण सामान्य बालकांचाच विचार करतो. सामान्य बालक म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या ज्याची वाढ सरासरी अथवा अधिक होते, त्याला आवश्यक अशा सोईसुविधा सहज मिळतात, त्यांचे संगोपन व संरक्षण सहज वातावरणात होते, त्याचा बुद्ध्यांक सरासरीइतका अथवा अधिक असतो. अशी मुले सर्वसाधारण बालवाडी, शाळा इत्यादींमधून शिक्षण घेत त्यांचा स्वाभाविक विकास होत राहतो; पण असामान्य मुलांचे तसं होत नाही.

 अशा असामान्य मुलांनाच आज ‘वंचित बालक' अशी संज्ञा देण्यात आली आहे. ही मुले सर्वार्थांनी असामान्य असतात. जन्म, संगोपन, विकास, शिक्षण, स्वावलंबन इत्यादी प्रक्रियांतून जात असताना अशा बालकांना मोठ्या दिव्यातून जावे लागते. ही मुले सामाजिक, मानसिक व शारीरिकष्ट्या अपंग असतात. सामान्य बालकाला सहज मिळणाच्या संगोपन, शिक्षण, विकासाच्या सोई-सुविधंना ती पारखी झालेली असतात; म्हणून अशा बालकांना ‘वंचित बालक' असे संबोधले जाते. समाजातील अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, दारिद्रयरेषेखालील बालके, वेश्या, कुष्ठरोगी, देवदासी यांची आपद्ग्रस्त बालके; शिवाय उनाड, भटकी, भिक्षेकरी मुले; तसेच अंध, अपंग, मतिमंद बालके या सर्वांचा अंतर्भाव ‘वंचित बालक' या संज्ञेत केला जातो. वंचित

एकविसाव्या शतकातील शिक्षण/५७