पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 शिक्षणाचा प्रचार व प्रसार हे सरकारचे काम आहे, अशा स्वरूपाचा तटस्थपणातून व एका अर्थाच्या निष्क्रियतेतून आपण जोवर स्वतःला मुक्त करून घेणार नाही, तोवर या देशाचे बाल्य असेच अपेक्षित राहणार. ते व्हायचे नसेल तर मुलांच्या सर्व तहेच्या हक्कांच्या अंमलबजावणीचा आपण आग्रह धरायला हवा. 'Children first' म्हणणाच्या देशासच काही भविष्य असते. तो देशच दूरदर्शी असतो. आपल्याइतकीच प्रगतीची वर्षे मिळालेले जपान, इस्त्राईलसारखे देश जे करू शकतात, ते आपण करू शकलो नसल्याची खंत आपल्या मनात जोवर खदखद निर्माण करणार नाही, तोवर शिक्षण केवळ खोगीरभरतीचा एक उद्योग बनून राहणार. उद्याच्या पिढीचे आपण जर काही देणं लागत असू, तर प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत हक्कांची उद्वेगजनक पायमल्ली विनाविलंब थांबवायला हवी.

 महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर आपल्या प्राथमिक शिक्षणापुढे दोन यक्षप्रश्न सध्या उभे ठाकले आहेत. पहिला शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? दसरा शिक्षणाच्या दर्जाचे प्रमाणीकरण करायचे का? पैकी एका प्रश्नाने माजघरात प्रवेश केला आहे, तर दुसरा प्रश्न अंगणात येऊन उभा आहे. आपण शिक्षणाकडे फारसे गांभीर्याने पाहत नाही. प्रशासन, समाज, पालक, नेते सर्वांनी शिक्षणात ‘मागणी तसा पुरवठा करण्याचे धोरण अवलंबिल्याचे दिसतं. त्यामुळे ‘हुल उठवायची नि भूल पाडायची' असे तंत्र शासनाने अवलंबले आहे. कोणत्याही राजसत्तेस माणसे नको असतात. त्यांना हवी असतात मते. त्यामुळे सवंग धोरण शासन स्वीकारत असते. सध्या जागतिकीकरणाचे वारे आहे. अमेरिका हे साच्या जगाच्या प्रगतीचे प्रमाणिक लक्ष्य' (Standard Goal) झाले आहे. उच्च आणि उच्चमाध्यम वर्गातील मुले इंग्रजी माध्यमात शिकतात, ती स्पर्धा परीक्षांत उत्तीर्ण होतात, अशी हल सर्वत्र उठविली गेली आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाचं लक्ष्य आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालून एकतर त्याला उच्चवर्णीय बनवायचे; नाही तर अमेरिकेत पाठवायचे असे होऊन गेले आहे. समाजातील पालकांच्या या स्वप्नाळू आशावादाचा फायदा घेऊन शासनाने पहिलीपासून इंग्रजी शिकविण्याचे धोरण स्वीकारले. खरे शिक्षण साध्यकेंद्रित असायला हवे. ते मानवविकासाचे लक्ष्य असणारे हवे. आजच्या युगात ते अर्थलाभकेंद्री, रोजगाराभिमुख व स्वावलंबी बनविणारे हवे. शिक्षणाने आकलनशक्ती वाढायला हवी. ते सामान्यज्ञान विकसित करणारे असले पाहिजे. आज केवळ ते 'तंत्र' नि ‘ज्ञान' केंद्रित होत आहे. साधन विकास करणारे शिक्षण साध्य हरवलेले असते हे विसरून

एकविसाव्या शतकातील शिक्षण/४६