पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

(Professional) आहेत. विद्यार्थी ग्राहक (Stakeholder) आहेत. पालक प्रायोजक (Sponsored) आहेत. संस्थाचालक अर्थपुरवठादार (Financer) आहेत. अशी एक जबाबदार, रोखठोक व्यवस्था येऊ पाहते आहे. प्रत्येक घटक एकमेकांस जबाबदार नाही, तर मोबदल्याचा हक्कदार आहे, अशी धारणा राहील. या व्यवस्थेमुळे उत्कृष्टतेपेक्षा उत्कृष्टतम देण्याचे ध्येय असेल.
संस्थेचे नेतृत्व
 त्यासाठी येथून पुढे शिक्षण संस्थांना द्रष्ट्या नेतृत्वाची (Visionary Leadership) गरज भासेल. तो आपले लक्ष्य निश्चित करील, दिशा ठरवील, ग्राहक निश्चित करील, तो आपल्या संस्थेची मूल्ये (Values) ठरवील. आकाशस्पर्शी यश हे त्याचे ध्येय असेल. हे सारे विद्यार्थिकेंद्रित असेल. तो विद्यार्थिहित साधण्याची नीती, व्यूहरचना निश्चित करील, कार्यपद्धती ठरवील व त्यातून गुणवत्ता संपादण्याचे सर्व प्रयत्न करील. त्यासाठी तो नवनवीन उपक्रम हाती घेईल. विद्यार्थी क्षमता वर्धन हे त्याच्या साच्या धडपडीचे केंद्र असेल या सर्वांतून तो आपल्या संस्थेच्या स्थैर्याचे सर्व ते प्रयत्न करील त्यासाठी तो नव-नवीन उपक्रम हाती घेईल. विद्यार्थी क्षमता वर्धन त्याच्या साच्या धडपडीचे केंद्र असेल. या सर्वांतून तो आपल्या संस्थेच्या स्थैर्याचे सर्व ते प्रयत्न करील. तो सर्व शिक्षक वा प्रशासकीय कर्मचा-यांना आपल्या संस्थेची दृष्टी देईल. त्यांना त्या दृष्टीने प्रेरणा, प्रशिक्षण व प्रोत्साहन देईल. शिक्षकांची उपक्रमशीलता, सर्जनशीलता, सतत शिकण्याची वृत्ती, विद्यार्थिकेंद्री व्यवहारपद्धती यांना असाधारण असे तो महत्त्व देईल. तो नुसता मुख्याध्यापक व प्राचार्य असणार नाही; तर तो कुशल प्रशासक, योजक, संयोजक असणे अनिवार्य होईल. त्यामुळे केवळ वरिष्ठतेच्या आधारवर पद मिळविण्याचा काळ संपुष्टात येईल. पात्रता, क्षमता, कष्टाळूपणा, सर्व वेळ सेवक होणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतील. अल्पकालीन कार्यासाठी पूर्णवेळ पगार ही संकल्पना इतिहासजमा होऊन कामानुसार वेतन पद्धती अस्तित्वात येईल. पात्रतेपेक्षा (Qualification) कार्यक्षमता (Ability) कौशल्य (Skill of Excellence) यांच्या कसोटीवर शिक्षक, मुख्याध्यापक निवडले जातील ते आपापल्या क्षेत्रातील आदर्श अथवा तज्ज्ञ (Role Model or Expert) असतील.
विद्यार्थिकेंद्री गुणवत्ता

 शाळा किंवा शिक्षकाची गुणवत्ता विद्यार्थी ठरविल. त्यामुळे त्याला देण्यात येणा-या सर्व सेवांत गुणवत्ता ही कसोटी असेल. शाळेच्या सुविधा, शिक्षकांचे ज्ञान, विद्यार्थी-शिक्षक संवाद व व्यवहार, शाळेची कार्यपद्धती,

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१६