पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केले. माध्यमिक पाठ्यक्रम भाषा, समाजशास्त्र व विज्ञान / गणित अशा सर्व पद्धतींनी आधुनिक केला. तो -

 १. भाषा राष्ट्रभाषा (हिंदी)
मातृभाषा (मराठी)
आंतरराष्ट्रीय भाषा (इंग्रजी)
 २. समाजशास्त्र    इतिहास
भूगोल
नागरिकशास्त्र
 ३. विज्ञान भौतिकशास्त्र
रसायनशास्त्र
जीवशास्त्र
 ४. गणित अंकगणित
बीजगणित
भूमिती

 सर्वदिशी त्रिमितिक केला.

 याशिवाय कला, क्रीडा, कार्यानुभव, समाजसेवा, संगीत इत्यादींची जोड देऊन तो बहुमुखी होईल असे पाहिले. आता नव्या आकृतिबंधात विदेशी भाषा (जर्मन, फ्रेंच व जपानी) अंतर्भूत करून माध्यमिक अभ्यासक्रमास वैश्विक परिमाण देण्याचा प्रयत्न होतो आहे. पर्यावरणशास्त्राची जोड देऊन तो समकालीन सुसंगत बनविण्यात येत आहे.

 गुणवत्ता संवर्धनाच्या या प्रयत्नात आपणास फारसे काही नवे न करता आलेला स्तर म्हणजे + २ (इयत्ता अकरावी व बारावी) मुळात हा स्तर व्यावसायिक ठेवण्याची कल्पना होती; पण त्या वेळी (इ. स. १९७७ साली) आणीबाणीचा काळ होता. आर्थिक तरतुदींकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नाही. व्यावसायिक शिक्षणप्रसाराच्या दृष्टीने जी संरचना (Infrastructure) उभारणं जरूरीचे होते, ते न झाल्याने या स्तराची उपेक्षा झाली ती आजअखेर. नाही म्हणायला ज्या उच्च माध्यमिक शाळा (ज्युनिअर कॉलेज) महाविद्यालयांशी संलग्न होत्या, त्यांना महाविद्यालयीन संरचनेचे फायदे मिळाले. काही उच्च माध्यमिक शाळांत किमान कौशल्याचे अभ्यासक्रम सुरू झाले;

एकविसाव्या शतकातील शिक्षण/१२