पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

शिक्षण व गुणवत्ता संवर्धन


 एकविसावे शतक हे शिक्षणाच्या दृष्टीने ‘गुणवत्ता संवर्धन शतक' होय. स्वातंत्र्यानंतर आपण साक्षरता हे आपले ध्येय ठेवले होते. ते १० टक्के जरी आपण साध्य केले नसले तरी ‘गाव तिथे शाळा' धोरण राबवून साक्षरतेचे मान (प्रमाण) उंचावले. जिल्हा, राज्य साक्षर करण्यापर्यंत आपण मजल मारली, सारा देश साक्षर व्हावा म्हणून आपण प्रयत्नशील आहोत.
 बालशिक्षणाच्या संदर्भात पाडे, वस्ती, गाव इत्यादींमध्ये अंगणवाड्या उघडल्या आणि नवी पिढी निरक्षर राहणार नाही, याची काळजी घेतली. त्याचे अनुकूल परिणाम मंदगतीने का असेना, आपणासमोर येत आहेत. प्राथमिक स्तरावर एकशिक्षकी शाळांचे रूपांतर बहशिक्षकी शाळांत करीत आपण पूर्व प्राथमिक व प्राथमिक (बालवाडी ते इयत्ता चौथी) स्तरावर शिक्षण सर्वसाध्य केले. सर्व शिक्षा अभियान' राबवून प्राथमिक शिक्षण सकस नि समृद्ध करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. शहरी भागात शिक्षण मंडळांमार्फत आपण वंचितांचे शिक्षण, संगणक शिक्षण, दृक्-श्राव्य शिक्षण, समुपदेशन सेवा इत्यादींमार्फत प्राथमिक शिक्षणात गुणवत्ता वाढविण्याचा आग्रह धरत आहोत. शिक्षकांची पदभरती मोहीम आपण राबविली. इंग्रजी शिक्षणाची पहिलीपासून सुरुवात केली. पोषण आहार योजना राबविली. स्मार्ट पी.टी.द्वारे शिक्षक प्रशिक्षण यशस्वी केले. प्राथमिक शिक्षण राजकारणमुक्त करण्याच्या आपल्या प्रयत्नांना यश येत आहे. पदवीधर शिक्षकांची वाढती संख्या एक आशेचा किरण बनत आहे.

 सन १९७५ साली अपण १० + २ + ३ असा त्रिस्तरीय राष्ट्रीय कार्यक्रम राबविला. त्यात पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्तरावर लक्ष केंद्रित

एकविसाव्या शतकातील शिक्षण/११