पान:एकविसाव्या शतकातील शिक्षण (Eakavisavya shatakatil shikshan).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोष्ट अशी की, कोल्हापूर जिल्ह्यापुरते बोलायचे झाले तर शिक्षणाबद्दल गंभीरपणे विचार करणा-या व्यक्ती, संस्था, संघटना यांनी एकत्र येऊन जानेवारी २०१० मध्ये एका व्यापक शिक्षण विचार परिषद घेण्याचा संकल्प सोडला. त्याच दरम्यान कोल्हापुरात प्रथमच भव्य असा ‘राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सव योजल्याने शिक्षक, वाचन, ज्ञान, संस्कार, इत्यादी अंगांनी सर्व समाज संघटित व सक्रिय होत आहे.
राष्ट्रीय ज्ञान आयोगाच्या शिफारशी
ग्रंथालय
१. ग्रंथालय विकासासाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करावा.
२. भारतातील सर्व ग्रंथालयांचा अभ्यास केला जावा.
३. ग्रंथालयशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान विद्याशाखा, ग्रंथपाल प्रशिक्षण, शिक्षण व संशोधनाची पुनर्रचना व नवी आखणी केली जावी.
४. ग्रंथालयातील कर्मचारी वर्गाच्या सेवाशर्ती वेतन व कार्यकुशलतेचा अभ्यास केला जाऊन त्यात सुधारणा घडवून आणाव्यात.
५. ग्रंथालयातील विद्यमान ग्रंथसंग्रहण, वर्गीकरण, संरक्षण यंत्रणेत आमूलाग्र क्रांती केली जाऊन तिथे नव्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ही ग्रंथालये ई-ग्रंथालये करण्यावर भर देण्यात यावा.
६. ग्रंथालय विकासासाठी देणगी, व्यक्तिगत ग्रंथसंग्रह, इत्यादींवर लक्ष केंद्रित करण्यात यावं.
७. ग्रंथालय माहिती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात लोकशिक्षण, लोकसहभाग, लोकप्रबोधन अशा विविधांगांनी ही केंद्रे समाजकेंद्रे बनवावीत.
८. ग्रंथालये अत्याधुनिक करण्यावर व त्यात जनसहभाग वाढविण्यावर भर द्यावा.


अनुवाद
१. भारतीय भाषा व साहित्य विकासार्थ उच्च दर्जाच्या अनुवादाची यंत्रणा विकसित करण्याचे ध्येय निश्चित करण्यात यावं.
२.अनुवाद व अनुवादक निर्मितीसाठी शिक्षण व प्रशिक्षणाचा धडक कार्यक्रम हाती घ्यावा.

३. अनुवाद संदर्भातील राष्ट्रीय माहिती संकलन, संशोधन केंद्र व यंत्रणेची स्थापना केली जावी.

एकविसाव्या शतकातील शिक्षण/११४