Jump to content

पान:उर्जा व पर्यावरण.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Bi hullum dipupul ४६ ४५ ट्रान्सफॉर्मर तीन स्वतंत्र वाईंडिंग ऑटो ट्रान्सफॉर्मर ४७ तीन पोल स्विच १) सिंगल लाईन २) मल्टी लाईन रिप्रेझेंटशन ४८ । एक्झॉस्ट फॅन ४९ फॅन रेग्युलेटर वरील सांकेतिक चिन्हांच्या अभ्यासापैकी १ ते ३५ ही सांकेतिक चिन्हे नेहमीच्या वापरातील असल्यामुळे ती लक्षात ठेवावीत व ती विद्यार्थ्यांच्या वहीत लिहून द्यावीत. प्रस्तावना व सांकेतिक चिन्हे काढणे व माहिती सांगणे. निदेशकाने विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरातील, घरातील विविध विद्युत उपकरणे व त्यावरील सांकेतिक चिन्हे दाखवावीत. सांकेतिक चिन्हे वापरून एखाद्या खोलीतील किंवा शाळेतील वायरिंगचे डॉईंग काढणे. तसेच चिन्हांचे महत्त्व विविध उदाहरणांतून पटवून देणे, प्रात्यक्षिक : सिंपल सर्किट, एकसर व समांतर जोडणी. सिंपल सर्कीट : सिम्पल सर्कीटचे पुढीलप्रमाणे दोन प्रकार पडतात. (१) एकसर जोडणी (२) समांतर जोडणी १. एकसर जोडणी : (१) एका स्विचने दोन दिवे नियंत्रित करणे. (२) एका स्विचने तीन दिवे नियंत्रित करणे. उदा. इलेक्ट्रिकल दुकानामध्ये सण-समारंभासाठी (गणेशोत्सव, नवरात्रोत्सव इ.) विक्रीस असणाऱ्या माळा एकसर पद्धतीने तयार केलेल्या असतात. २. समांतर जोडणी : (१) एका स्विचने एक दिवा नियंत्रित करणे. (२) एका स्विचने दोन दिवे समांतर पद्धतीने नियंत्रित करणे. उदा. घरातील, कार्यालयातील वायरिंग ही समांतर जोडणी या पद्धतीने केलेली असते. एकसर जोडणी पद्धतीत दिवे नेहमी कमी प्रखर लागतात तर समांतर जोडणी पद्धतीत ते प्रखरतेने प्रकाश देतात. विद्यार्थ्यांना हे करून दाखवावे. एकसर जोडणीत व्होल्टेज हे विविध बल्बमध्ये विभागले जाते, तर समांतर जोडणीत पूर्ण व्होल्टज हे सर्व बल्बला मिळते. अपेक्षित कौशल्ये :(१) सांकेतिक चिन्हे ओळखणे, (२) नकाशा वाचन करता येणे आवश्यक आहे. (३) इलेक्ट्रिकल सर्कीटची जोडणी करणे. (४) साधनांचा वापर करणे. (५) व्होल्टेज मोजता येणे. (६) टेस्टरचा वापर करता येणे. (७) वायरवरील इन्सुलेशन आवश्यक तेवढे काढणे.