पान:उर्जा व पर्यावरण.pdf/5

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऊर्जा-पर्यावरण इयत्ता : ८ वी दिवस: पहिला प्रात्यक्षिक : सांकेतिक चिन्हे व सिम्पल सर्किट एकसर व समांतर जोडणी. प्रस्तावना: आधुनिक समाजात विजेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. वीज ही घरात, दवाखान्यात, बँकामध्ये, कार्यालयामध्ये वापरली जाते. विजेचे काम करत असताना यासंबंधीची सांकेतिक चिन्हे व संपूर्ण माहिती माहीत असणे आवश्यक आहे. सांकेतिक चिन्हे ही एखादे ठिकाण, वस्तू, चित्र इत्यादी बद्दलची विशिष्ट माहिती दर्शवितात. सांकेतिक चिन्हे ही सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था तयार करते. सांकेतिक चिन्हांचा उपयोग, नकाशे, दळण-वळण, शासकीय कामकाजाकरिता त्याचप्नमाणे विद्युत क्षेत्रामध्ये पॉवर वायरिंग डायग्राम तसेच इतर विजेची कामे करण्याकरिता सांकेतिक चिन्हांचा चांगला उपयोग होतो. सुरक्षिततेचे नियमः IBT विभागात काम करण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याने सुरक्षिततेचे नियम माहीत करून घेतले पाहिजे. शिक्षकांनी विभागातील व बाहेरील कामे करताना होणारे संभाव्य धोके व ते टाळण्यासाठी घेण्याची काळजी विद्यार्थ्यांना समजावून सांगावी. दक्षता: (५) इलेक्ट्रीक सप्लाय टेस्ट लॅम्पच्या साहाय्याने चेक करणे. काम करण्यापूर्वी उपकरणांचे सप्लाय व फ्युज, मेन स्वीच बंद करावेत व 'काम चालू आहे' असा फलक तेथे लावावा. काम करताना हॅण्डग्लोज व रबर सोल असलेले सेफ्टी शूज वापरावेत. प्रत्येक पॉवर पॅनल खाली रबरी मॅट असल्याची खात्री करा. उपकरणाला जोडलेल्या अर्थिगची खात्री करावी. (६) उंच ठिकाणी काम करताना योग्य त्या सुरक्षा बाळगाव्यात. काम झाल्यावर कामाची जागा स्वच्छ करावी. (८) विजेमुळे आग लागल्यास पाण्याचा वापर करू नये. (९) टेस्टरचा वापर फक्त फेज चेक करण्यासाठीच करावा, स्कु ड्रायव्हर सारखा करू नये. (१०) इलेक्ट्रीक काम करताना इन्सुलेटेड हत्यारांचा वापर करावा. (११) फ्युज तार जळाल्यास योग्य त्या क्षमतेचीच फ्युज तार वापरावी.