________________
दिवस : चौथा प्रात्यक्षिक : वीज बिल काढणे (मीटर रिडींग घेऊन व लोडवरून अंदाज करणे.) प्रस्तावना : आधुनिक काळात वीज ही अन्न,वस्त्र, निवाऱ्याबरोबरच मानवाची मूलभूत गरज बनली आहे. यांत्रिक साधनसामुग्रीचा वापर करण्याकरिता विद्युत पुरवठयाची आवश्यकता असते. आजच्या काळात वीजेला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येकाच्या घरी विजेच्या ऊर्जा मापनासाठी एनर्जी मीटर बसवलेले असते. पण महिन्याच्या शेवटी विजेचे बील जेव्हा हातात पडते तेव्हा विनाकारण आपणास मीटर विषयीच शंका यायला लागते. परंतु आपण घरातील वापरल्या गेलेल्या उपकरणांची व त्यास लागणाऱ्या विद्युत पुरवठयाची कधीच दखल घेत नाही. विद्युत मंडळाने सादर केलेल्या बिलावर विसंबून ती रक्कम भरणा केली जाते. घरातील वापरलेल्या उपकरणास लागलेली वीज किती आहे व त्याचे मूल्य किती याबाबत आपण कधी विचार करत नाही व जास्तीची रक्कम दिली जाते. या प्रकरणामध्ये आपण घरातील वापरलेल्या उपकरणांच्या वापरानुसार वीज बिल काढणे शिकणार आहोत, साधने : वीज मीटर, गणकयंत्र (Calculator), वही, पेन्सील इ. पूर्व तयारी: (१) घरगुती वापरात येणाऱ्या विद्युत उपकरणांची संख्या व वॅट याबाबतचा तक्ता विभागात लावलेला असावा. उदा. टी.व्ही, इस्त्री, फॅन,ट्यूबलाईट, बल्ब, शेगडी, फ्रीज, कॉम्प्युटर इ. (२) आपल्या शाळेतील मीटरचे वीजबील काढण्यासाठी प्रत्यक्ष जाऊन त्याचे रिडींग घ्यावे. उपक्रमांची निवडः (१) शाळेतील विद्युत उपकरणांची संख्या व वॅट वरून एक महिन्याचे बिल किती येईल, याचा अंदाज गणिताच्या आधारे करा. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरातील महिन्याचे वीज बिल उपकरणांची संख्या व वॅट वरून काढावे. (३) विद्यार्थ्यांनी चालू मीटर रिडींग घेऊन पूर्वीच्या वीज बिलासोबत त्याची तुलना करून एक महिन्याचे बिल काढा व तुलना करा. घरगुती विजेचे बिल काढताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात : (१) 'घरगुती', 'व्यापारी' अशी ग्राहकांची वर्गवारी केलेली असते. दोहोंनाही दर वेगवेगळे असतात. (२) बिलाची आकारणी टप्प्यानुसार केली असल्याने पहिल्या काही युनिटस्साठी एक दर, तर पुढील युनिटला वेगळा दर असतो. (३) वीज युनिट दराव्यतिरिक्त वीजभार, इंधन आकार, कर तसेच मीटर भाडे इत्यादी गोष्टींचा वीज बिलामध्ये समावेश करावा लागतो. उदा.(१) एका घरात दररोज १५ वेटचा रंगीत बल्ब २४ तास, ६०वटचा पंखा ४ तास, २०० वॅटचा टी.व्ही. ४ तास, ४० वॅटच्या दोन ट्यूब ६ तास, १००० वॅटचा गीझर अर्धा तास लावला जातो, तर त्या घरात दररोज किती युनिट ऊर्जा खर्च होईल? व फेब्रुवारी २००४ मध्ये एकूण किती ऊर्जा खर्च होईल? (२) प्रत्यक