Jump to content

पान:उर्जा व पर्यावरण.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कॉईल असते. कोणत्याही फेजमधील करंट फार वाढला (दोषामुळे), तर जोड पट्ट्या वाकतात व पिन पुढे जाते व लाल बटनाजवळ सर्कीट तुटते व ठध,इ सप्लाय बंद होतो. थोड्या वेळाने जोड पट्टी थंड झाल्यावर लाल बटन दाबल्यावर (रिसेटपरत बसविणे) पिन जागेवर येते व हिरवे बटन दाबून मोल परत चालू करता येते. D.O.L.स्टार्टर वापरल्यामुळे होणारे फायदे: संरक्षण - जास्त करंट जाऊन मोटर जळत नाही. एकच फेज चालू असल्यास मोटरींना धोका नाही. (२) मोटर चालू बंद करणे सोपे होते. (३) चालू - बंद करण्याचे बटन दूर ठेवता येते. थ्री फेज मोटर जोडणे उद्देश : थ्री फेज मोटर जोडण्यास शिकणे. साहित्य : ६नंते ३० नं. पर्यंतचा स्पॅनर सेट, स्क्रू ड्रायव्हर, हातोडी, पक्कड, बेअरिंग पुलर,छन्नी इ. साधने: एक खोललेली थ्री फेज मोटर, पॉलिश पेपर, ग्रीस इ. आकृती: थ्री फेज मोटरचे भाग (१) कास्ट आयर्न फ्रेम 135,146,44 (२) रोटर (३) ड्राईव्ह एन्ड कव्हर (४) फॅन कव्हर (५) नॉन ड्राईव्ह एन्ड कव्हर (६) फॅन (७) टर्मिनल बॉक्स (८) आर्थिग टर्मिनल (९) नेम प्लेट (१०)टर्मिनल (११) बॉक्स कव्हर (१२) स्टेटर (१३) बेअरिंगची आतील कॅप (१४) बेअरिंगची बाहेरील कॅप (१५) बेअरिंग कृती : प्रथम खोललेल्या मोटरचे सर्व पार्टस् स्वच्छ झटकून घ्यावेत. स्टेटरच्या आतील बाजूस वर असेल तर पॉलिश पेपरच्या साहाय्याने घासून घ्यावा. त्यानंतर नॉन ड्राईव्ह एंड कव्हर व ड्राईव्ह एंड कव्हरमध्ये असणाऱ्या बेअरिंग रॉकेलने स्वच्छ धुवून घ्याव्यात. दोन्ही बेअरिंग स्वच्छ पुसून कोरड्या करून घ्याव्यात व त्यांना ग्रीसींग करावे. सर्व नटबोल्ट एका जागेवर गोळा करून त्यांचे लांबीनुसार गट करावेत व मोटर जोडण्यास सुरुवात करावी. प्रथम स्टेटर घेऊन त्यास नॉन-ड्राईव्ह एंड कव्हर बसवावा. नंतर रोटर स्टेटरच्या आत हळूवारपणे बसवावा. नंतर स्टेटरच्या दुसऱ्या बाजूस ड्राईव्ह एंड कव्हर बसवून घ्यावा. नंतर बेअरिंगची बाहेरील कॅप नटबोल्टच्या साहाय्याने बसवून घ्यावी. त्यानंतर नॉन-ड्राईव्ह एंड कव्हरच्या बाहेर आलेल्या शाफ्टला key व्यवस्थित बसवून ४४