पान:उर्जा व पर्यावरण.pdf/43

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४) एकूण असणारा लोड प्रत्येक सर्कीटवरसारख्या प्रमाणात विभागला जातो. (५) मेन सर्कीट वायरला दिल्या जाणाऱ्या जॉईंटचे प्रमाण कमी होते. डिस्ट्रिब्यूशन बॉक्समध्ये वायर्स जोडताना घ्यावयाच्या दक्षता: (१) प्रत्येक सबसर्कीटकडून स्वतंत्रपणे लाईव्ह व न्यूट्रल वायर्स आणून त्या अनुक्रमे फ्यूज व लिंकमध्ये जोडतात. (२) जेथून वायर्स प्रवेश करतात त्या जागी रबरी अथवा पी.व्ही.सी.चे बुश बसवतात. (३) हा लोखंडी असल्यामुळे याला अर्थ वायर जोडतात. (४) वायरिंगमध्ये काँडयूट पाईप वापरल्यास त्याचे तोंड बॉक्सच्या आत घेऊन आतून चेकनट लावतात. (५) पाईपच्या तोंडाशी पी.व्ही.सी.चे बुश वापरतात. (६) फ्लेक्झिबल पाईप असल्यास सॉकेटचा उपयोग करतात. (७) केबल असल्यास ग्लँडचा वापर करतात. मेनस्विचमध्ये फ्यूज जोडताना घ्यावयाच्या दक्षता : मेनस्विचमध्ये ज्या बाजूच्या कटआऊटला लाईव्ह वायर जोडली असेल त्या कटआऊटमध्ये योग्य आकाराची फ्यूज तार टाकतात. लाईव्ह बाजूच्या कटआऊटवर लाल रंगाने (+) अशी खूण करतात. ज्या बाजूच्या कटआऊटमध्ये डेड वायर जोडली असेल त्या बाजूच्या कटआऊटमध्ये लिंक टाकतात. डेड बाजूच्या कटआऊटवर काळ्या रंगाने (-) अशी खूण करतात. फ्यूज तार जळालेली असल्यास मेनस्विच बंद करून फ्यूज टाकतात. दिवस : तिसरा प्रात्यक्षिक : डी.ओ.एल.स्टार्टर व थ्री फेज मोटारची जोडणी करणे. | | प्रस्तावना : पूर्वी शेतकरी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी बैलाच्या साहाय्याने विहिरीतील पाणी काढण्यासाठी मोटीचा वापर करत असे. विहीरीतील पाणी काढण्याचे काम सोपे करण्यासाठी तत्कालीन संशोधकांनी डिझेल इंजिनसारख्या यंत्राचा शोध लावला व वापर करावयास सुरूवात केली. त्यानंतर विजेचा शोध लागला व गावागावात पसरू लागली तेव्हा त्या विजेचा शेतीसाठी पाणी देण्यासाठी करता येईल का ? याचा विचार होऊ लागला व त्यातूनच पुढे विद्युत मोटरचा शोध लागला आणि त्या विद्युत मोटरचा सर्रास वापर होऊ लागला. जस जसा वापर वाढू लागला तसतसा त्यामध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढू लागले. त्यामध्ये सर्वात मोठे प्रमाणे हे विद्युत मोटर जळण्याचे होते. विद्युत मोटर जळणे मागील कारण म्हणजे विजेचा दाब कमी जास्त होणे हे होते. वीज गेल्यानंतर व पुन्हा आल्यावर मोटर आपोआप सुरू व्हायची. असे होऊ नये म्हणून Direct Online डि.ओ.एल.स्टार्टर सारख्या उपकरणाची गरज भासू लागली व त्याचा शोध लागला आणि आधुनिक काळात प्रत्येक मोटरला डी.ओ.एल.ची जोडणी होऊ लागली. साहित्य : पक्कड, स्क्रू ड्रायव्हर, सर्व आकाराचे स्पॅनर, हातोडी, छिन्नी, टेस्टर, वायर कटर, इलेक्ट्रिशियन चाकू इ. साधने : थ्री फेज मोटर, पॉलिश पेपर, ग्रीस, स्टार्टर इ. ४२