पान:उर्जा व पर्यावरण.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

फ्यूज वायर सिलेक्शन कसे करावे? १. एकंदर लोड माहिती करून घ्यावा, समजा - ६० वॅट = २ बल्ब = १२०, ४० वॅट = १ ट्यूब = ४०, १०० वट = टी.व्ही. = १००, एकूण = २६० वॅट शक्ती शक्ती (वॅट) V*I (व्होल्ट X करंट) शक्ती २६० वॅट .. I - = 220 होल = १.१३ Amp. फ्यूज वायर २ Amp. क्षमतेची वापरावी. फ्यूज वायर कोणती वापराल ? घरातील एकंदर लोडची माहीती घ्या, त्या घरासाठी फ्यूजचा हिशोब करा. ___ एकूण लोड = वॅट शक्ती पॉवर (वॅट) = व्होल्टेज (व्होल्ट) X करंट (अँपीअर) करंट = वट व ट =___Amp. (येथे Amp. ची फ्यूज वायर वापरावी.) व्होल्टेज २३० टीप : वायरिंगचे ओव्हर लोडपासून संरक्षण होण्यासाठी लोडच्या आधी लोडच्या किंमतीपेक्षा १-२ Amp. जास्त क्षमता असलेली फ्यूज वायर वापरतात. प्रश्न : फ्यूज वायर २ Amp. आहे कशी ओळखावी - फ्यूज वायरची क्षमता मोजावी फ्यूज, फ्यूजचे प्रकार व उपयोग : शैक्षणिक साधने : वेगवेगळ्या फ्यूजची रचना दाखविणारे तक्ते. (१) विद्युत परिपथात शॉर्टसर्कीट किंवा ओव्हरलोड सारखे दोष उत्पन्न झाल्यास त्या परिपथातून मर्यादेपेक्षा जास्त प्रवाह वाहू लागतो. दिपेक्षा जास्त वाहणाऱ्या या प्रवाहामुळे वाहक अतिशय उष्ण होऊन इन्सुलेशन वितळते अथवा जळते व त्यामुळे परिपथ व त्याच्या उपसाधनांचे नुकसान होते, तसेच आग लागण्याची शक्यता असते. म्हणून परिपथ व उपसाधनांच्या संरक्षणासाठी फ्यूजचा उपयोग करतात. (२) फ्यूज : हे एक संरक्षक साधन असून विद्युत परिपथातून मर्यादेपेक्षा जास्त प्रवाह ठराविक वेळेपेक्षा जास्त वेळ वाहिल्यास वितळतो व विद्युत पुरवठा खंडित करतो. फ्यूज हा शब्द त्यातील घटकांना मिळून वापरतात. (३) फ्यूजसंबंधी काही व्याख्या : फ्यूजतार (वितळतार) : विद्युत परिपथातून जास्तीचा प्रवाह वाहू लागलाच जी तार वितळते त्या तारेस फ्यूज तार असे म्हणतात. फ्यूज तारेचा विलय बिंदू कमीतकमी असला पाहिजे. मिनिमम फ्युजिंग करंट : ज्या कमीत कमी प्रवाहामुळे फ्यूज तार वितळते त्या कमीत कमी प्रवाहाच्या किमतीला फ्यूजिंग करंट असे म्हणतात. फ्यूज करंट रेटिंग : सर्वसाधारण परिस्थितीत फ्यूज तारेचे तापमान न वाढता सुरक्षितपणे जो जास्तीत जास्त प्रवाह फ्यूज तार वाहून नेते, त्या प्रवाहाच्या किमतीला फ्यूज करंट रेटिंग किंवा फ्यूज रेटिंग असे म्हणतात. फ्युजिंग फॅक्टर (फ्युजिंग गुणक) : मिनिमम फ्युजिंग करंट व फ्यूज करंट रेटिंग यांच्या गुणोत्तराला फ्युजिंग फॅक्टर म्हणतात. हा नेहमी १पेक्षा जास्त असतो. चांगल्या फ्यूजचा फ्युजिंग फॅक्टर१.४ पेक्षा जास्त नसतो. मिनिमम फ्युजिंग करंट (कमीत कमी प्रवाह) फ्युजिंग फॅक्टर (फ्युजिंग गुणक) = फ्यूज करंट रेटिंग (सुरक्षित प्रवाह) ३९