Jump to content

पान:उर्जा व पर्यावरण.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९) हिटर, शेगडी व इस्त्री इ. चा वापर नसेल तर एखाद्या इलेक्ट्रिकल दुकानामध्ये भेट देऊन माहिती घेण्यासाठी दुकानदाराशी संपर्क साधावा. पूर्व परवानगी घ्यावी. उपक्रमाची निवड:(१) शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये विद्युत पुरवठयाकरिता वेगवेगळ्या फ्यूजची व्यवस्था करा. (२) शाळेतील प्रत्येक फ्यूजमध्ये लोडच्या प्रमाणात फ्यूज तारा वापरल्या आहेत किंवा नाही हे तपासा व जर नसतील तर बदलाव्यात. (३) किती गेजच्या तारेमधून किती अॅम्पीअर करंट वाहतो या संबंधीचा तक्ता आपल्या विभागामध्ये लावा. अपेक्षित कौशल्ये: (१) फ्यूज तार सर्कीट आकृतीनुसार निश्चित करणे. (२) वेगवेगळ्या फ्यूजबाबतची माहिती असणे, (३) फ्यूज काढणे (कॅरिअर मधून) व वायर (तार) बदलून जोडणे. (४) सुरक्षिततेचे नियम माहिती असणे, विशेष माहिती: (१) फ्यूज हा नेहमी लोडच्या सिरीजमध्ये जोडावा. (२) फ्यूज लोडच्या प्रमाणात असल्यामुळे उपकरण जळत नाही. (३) उपकरणाच्या watt नुसार बाजारामध्ये वेगवेगळे फ्यूज उपलब्ध असतात. फ्यूज वायर उद्देश: फ्यूज वायरची क्षमता शोधणे. साहित्यः अॅमीटर, स्क्रू-ड्रायव्हर, 230V - N वायर कटर, टेस्टर, पक्कड़ साधने: फ्यूज वायर, फ्लेक्झिबल वायर, स्विच, रेग्युलेटर. फ्यूज वायरसह सर्कीट कृती : (१) आकृतीमधील सर्कीटप्रमाणे जोडून घ्या. (२) मात्र उपकरण म्हणून इस्त्री किंवा होल्डरसारखे खूप वीज लागणारे उपकरण जोडा. (३) आता फ्यूज होल्डरमध्ये प्रथम एक ३६ गेज तार टाका. रेग्युलेटर फिरवून करंट वाढवा व किती अँपीअरला ती जळाली का शोधा. (४) आता तारांची संख्या वाढवून पुन्हा किती अँपीअरला जळाली ते शोधा. ओळखा पाहू. खालीलपैकी सर्व तारा जर एकाच प्रकारच्या धातूंनी बनवलेल्या असतील तर कोणती तार जास्त करंट वाहून नेऊ शकेल? विविध जाडीच्या फ्यूज वायर (MCB) Miniature Circuit Breaker जर उपकरणाने लोड जास्त घेतला तर उपकरणाला इजा न पोहोचता फ्यूज वायर जळते व सप्लाय खंडित होतो. अलीकडे बाजारात नवीन प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आली आहेत. ती सर्व हीच भूमिका निभावतात. जर करंट एका विशिष्ट मर्यादपेक्षा वाढला तर सर्कीटचा प्रवाह खंडित केला जातो. फ्यूज वायर कशी निवडाल? ३८