पान:उर्जा व पर्यावरण.pdf/35

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऊर्जा-पर्यावरण इयत्ता : ९ वी दिवस : पहिला प्रात्यक्षिक : गोडाऊन वायरिंग, ट्यूबलाईट वायरिंगची जोडणी करणे प्रस्तावना : ज्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर धान्य साठवले जाते, त्या इमारतीला गोडाऊन असे म्हणतात. त्यामधील खोल्यांची संख्या भरपूर असते. तेव्हा गोडाऊनमधील वायरिंग करताना एक दिवा लागल्यानंतर दुसरा त्याचवेळी बंद होईल अशा पद्धतीने केलेले असते. त्या वायरिंगला गोडाऊन वायरिंग असे म्हणतात. अशा प्रकारचे वायरिंग केल्यामुळे चालू असलेला दिवा परत मागे येऊन बंद करावा लागत नाही किंवा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाईपर्यंत पहिल्या खोलीमधील दिवा चालू ठेवावा लागत नाही. त्यामुळे विजेची बचत सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. म्हणूनच गोडाऊनमध्ये अशा प्रकारची वायरिंग करणे सर्व दृष्टीने सोयीचे असते. या प्रात्यक्षिकासाठी लागणारी साहित्य व साधने खालीलप्रमाणे : (१) गोडाऊन वायरिंगकरिता लागणारी साहित्य, साधने: साहित्य : टू वे स्विच, वन वे स्विच, होल्डर, बल्ब, पॅक्टीकल बोर्ड, विविध रंगाच्या वायर, टू पिन प्लग साधने : पक्कड,नोज प्लायर, वायर कटर, टेस्टर, हॅक्सॉ ब्लेड (करवत) (२) ट्यूबलाईट जोडणीकरिता लागणारी साहित्य व साधने : साहित्य : ट्यूबलाईट पट्टी, ट्यूब नळी, चोक , स्टार्टर साधने: पक्कड,नोज प्लायर, वायर कटर, टेस्टर, वेगवेगळ्या रंगाच्या वायर, टू पिन/थ्रि पिन प्लग पूर्व तयारी: (१) दोन्ही प्रात्यक्षिकांसाठी लागणारी साहित्य व साधने आपल्या विभागात असल्याची खात्री करा. (२) गोडाऊन वायरिंग करण्यासाठी आपल्याकडे कमीतकमी चार प्रैक्टिकल बोर्ड तयार करून ठेवा. (३) ट्यूबलाईट जोडणीसाठी तीन-चार सेट आपल्याजवळ असावेत (४) आपल्याकडे असणाऱ्या विद्यार्थ्यांचे चार-चार गट करून घ्या. उपक्रमांची निवड : (१) उपलब्ध असलेली गोडाऊन वायरिंग व ट्यूबलाईट जोडणीची सी.डी. कॉम्प्युटरवर दाखवा, (२) चार-चार विद्यार्थ्यांचे केलेल्या गटात प्रात्यक्षिक बोर्डवरती गोडाऊन वायरिंगचा सराव करून घ्या. (३) आपल्या गावातील बाजारात उपलब्ध असलेल्या गोडाऊनमधील वायरिंगची पाहणी करून आपल्या वहीत सर्कीट डायग्राम काढून घ्या. (४) ४-४ विद्यार्थ्यांच्या गटात ट्यूबलाईट जाडणीचे प्रात्यक्षिक बोर्डवर करून घ्या. (५) शाळेतील वर्ग, ऑफिस व इतर ठिकाणी बंद असलेल्या ट्यूबलाईट दुरुस्त करा/चालू करा, (६) ग्रामपंचायतच्या ट्यूबलाईट कॉन्ट्रैक्ट पद्धतीने दुरुस्त करा. (अ) फ्लूरोसंट दिव्याची (ट्यूबलाईट) जोडणी करणे : साहित्यः१. फ्ल्यूरोसंट ट्यूब ४० Watt २५०Volts १ नग २. पट्टी, स्टार्टर, ट्यूब होल्डर्ससह ३४ १नग