________________
अपेक्षित कौशल्ये: (१) या दोन्ही सयंत्राची वापर व देखभाल संबंधीची माहिती असावी. (२) वायू गळतीसंबंधीचे ज्ञान. (३) उपलब्ध शेण, पाणी/मैला पाणी याप्रमाणात सयंत्राचे आकारमान ठरतो. (४) या सयंत्रातून मिळणारा गॅस कशासाठी वापरता येतो, याची माहिती. (५) शेणपाणी आणि मैला पाणी याशिवाय बायोगॅस सयंत्रामध्ये आणखी काय काय वापरले जाते. विशेष माहिती : (१) १ किलो शेणापासून १.३ घनफूट वायू मिळतो. (२) आपणाकडे जवढे शेण-पाणी मिश्रण मिळते त्याच्या ४० ते ५० पटीने मोठी टाकी प्रक्रियेसाठी वापरावी. (३) उदा. ३० लीटर शेणकाल्यासाठी ५०४३० = १५०० लीटर आकारमान असलेली टाकी लागेल. (४) गॅस साठविण्याची लोखंडी टाकी गंजू नये म्हणून आतून बाहेरून काळा रंग लावा. (५) लोखंडी टाकी दररोज वर्तुळाकार स्थितीत फिरवावी. (शेणाचा थर किंवा स्लरी अडकत नाही.) (६) गॅस वाहक नळी महिन्यातून एकदा साफ करावी. (७) या प्रकारचे सयंत्र वर्षातून दोन वेळा साफ करावे. (८) गॅसवर स्वयंपाक करतांना धूर अजिबात होत नाही. (९) KVIC प्रकारचे सयंत्राचे बांधकाम करतांना लोखंडी टाकी व बांधकामामध्ये २-३ इंच रुंदीची फट असावी. (१०) शेणकाल्यामुळे वर- खाली होणारा लोखंडी टाकीचा भाग गंजू नये म्हणून त्या फटीमध्ये पाच लीटर वंगणाचे काळे तेल सोडावे. (११) बायोगॅस सयंत्रामध्ये शेण व पाण्याचे प्रमाण १:१ असते तर मिळणाऱ्या बायोगॅसमधील मिथेन कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण ६५:३५ असेल (मिथेनचा ज्वलन वायू म्हणून उपयोग होतो.) दिवस : सातवा प्रात्यक्षिक : वातीचा व प्रेशर स्टोव्ह, एल.पी.जी. गॅस स्टोव्हचा अभ्यास करणे. प्रस्तावना : पुरातन काळात मानवाला अग्निचा शोध लागला. या अग्निचा वापर ते आपले अन्न शिजविण्यासाठी किंवा अन्न भाजून खाण्यासाठी करत असते. जसजशी मानवाची प्रगती होत गेली तसतशी अग्नीच्या वापरातही बदल करत गेला. त्यानंतर मानव अन्न शिजविण्यासाठी लाकडे जाळून चुलीचा वापर करू लागला. कालांतराने लोकसंख्या वाढू लागली व जंगलतोड होत गेली. परिणामी जळणासाठी सरपणाची कमतरता भासू लागली. त्यामुळे सरपणाच्या किंमती वाढू लागल्या. त्याच कालावधीमध्ये रॉकेलसारख्या खनिजाचा शोध लागला. मानवाने त्याचा उपयोग करून अन्न शिजवता येईल याचा विचार केला. त्याचवेळेस स्टोव्ह सारख्या गरजू साधनाचा पर्यायाने शोध लावला व मानव त्याचा आपले अन्न शिजविण्यासाठी उपयोग करू लागला. स्टोव्ह हे साधन मानवाचा अविभाज्य घटक बनला. स्टोव्हच्या सततच्या वापरामुळे होणारे बिघाड दुरुस्त करणे ही काळाची गरज बनली. म्हणूनच या सर्व स्टोव्हच्या दुरुस्तीबद्दलचा अभ्यास करणे गरजेचे आहे. पूर्व तयारी :(१) वातीचा स्टोव्ह, प्रेशर स्टोव्ह व एल.पी.गॅस शेगडी दुरुस्तीस खालील साधने वापरा. ३०