पान:उर्जा व पर्यावरण.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३. मिळणारा गॅस निधुर स्वरूपात जळत असल्याने स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यांना इजा पोहोचत नाही. ४. बायोगॅसपासून मिळणारी ऊर्जा इतर कामासाठी वापरता येते. उदा. : विजेचे दिवे, इंधन इ. बायोगॅसपासून मिळणाऱ्या ऊर्जाचे उपयोग : (१) स्वयंपाक करण्यासाठी इंधन म्हणून, (२) प्रकाश मिळवण्यासाठी, (३) इंजिन चालवण्यासाठी. बायोगॅस प्लॅट बायोगॅस प्लॅटमध्ये शेण, पाणी व इतर टाकाऊ पदार्थाच्या किण्वन प्रक्रियेपासून तयार होणारा गॅस (मिथेन व कार्बन डाय ऑक्साईड) साठवण्याची सोय असते. यात जनता संयत्र/ दिनबंधु व KVIC खादी ग्रामोद्योग असे दोन मुख्य रचना आहेत. १.जनता संयंत्र / दिन बंधु (Fixed Dome Type): मुख्य चेंबर हा गोलाकार असून ते काँक्रीटचे किंवा विटांचे बांधाकाम असते. शेण, पाणी, मानवी मैला व जैव कचरा हे फिलर टॅकच्या नळी (इनलेट) मधून मुख्य चेंबरमध्ये जाते. संयंत्राच्या एका बाजुला मळी (स्लरी) बाहेर निघण्याचा मार्ग असतो. मुख्य चेंबरमध्ये मिश्रणाचे प्रमाण वाढत जाते तसे गॅस व इतर गॅसचे प्रमाण वाढत जाऊन आतला दाब वाढत जाऊन स्लरी जास्त उंचावरून सुद्धा बाहेर पडते. आकृती १ : जनता सयंत्र पाक पात्र टाकी जाण्यासी जळी २. खादी ग्रामोद्योग संयंत्र / तरंगत्या टाकीचे संयंत्र (Floating Dome Type): या प्रकारात KVIC खादी ग्रामोद्योग संयंत्र हा प्रकार सर्वात जास्त प्रचारात आला व खूप मोठ्या संख्येने ही संयंत्रे बांधण्यात आली. कारण हे संयंत्र वापरणे फार सुकर आहे. ___KVIC संयंत्र मुख्य उपांग पाचक पात्र जमिनीच्या पृष्ठभागाखाली बांधलेले असते. त्याच्या तोंडावर वरखाली सरकणारी लोखंडी टाकी हे मुख्य दोन भाग अंतर्भूत आहेत. इतर जरूरीचे उपांगे-पूरक इनलेट आकृती २ : खादी ग्रामोद्योग सयंत्र पाईप, निकाल आऊटलेट पाईप व कुंडी इ. असतात. लोखंडी टाकी पाचकपात्रातील शेणकाल्यात तरंगती ठेवलेली असते. टाकीत जसजसा वायू जमत जातो तसतशी टाकी वर-वर सरकत जाते आणि टाकी पूर्णपणे वायुने भरी जाऊन शेणराडीच्या पातळीपर्यंत तरंगत राहते. टाकीच्या तोटीतून तोटी खुली करून वायु सोडला की टाकीच्या दाबाने वायुवाहक नलिकेने वायु बाहेर पडून टाकी खाली येऊ लागते. टाकी कलंडू नये म्हणून त्यास आधार सांगाड्याशी व्यवस्था केलेली असते. त्यास गाईड फ्रेम किंवा गाईड पाईप असे म्हणतात. २८