________________
दिवस : सहावा प्रात्यक्षिक : बायोगॅस सयंत्राचा अभ्यास करणे, प्रस्तावना : गोबर गॅस ही आपल्या गृहिणींसाठी उत्तम देणगी आहे. बायोगॅस हा गुरांच्या शेणापासून तयार केला जातो. त्या शिवाय संडासला पण जोडता येतो. आपणास त्यापासून गॅस, खत मिळतेच, त्याशिवाय आपल्या भोवतालच्या परिसरातील घाणीची योग्य व्यवस्था लावल्याने अनेक उपद्रवी कीटक व रोगजंतूचा उपद्रव टळतो. ग्रामीण भागातील आरोग्य सुधारते. ग्रामीण शेतकऱ्यांसाठी गॅस प्लँट ही एक आधुनिक उत्तम देणगी आहे. ग्रामीण भागातही जळणाची फार मोठी टंचाई दिसून येते. कारण लोकसंख्येच्या वाढीप्रमाणे झाडांची लागवड होत नाही. म्हणून आपण सर्वांनी बायोगॅस सयंत्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे. बायोगॅस (संयंत्र)चा अभ्यास करणे. प्राण्यांच्या विष्टेतील सेंद्रिय पदार्थांचे काही सूक्ष्म जिवाणुद्वारा विघटन होऊन बायोगॅस तयार होते. जनावरांच्या शेणापासुन ज्वलनासाठी उपयोगात येणारे वायुरूप इंधन म्हणजे बायोगॅस (गोबरगॅस) होय. बायोगॅस म्हणजे मिथेन व कार्बन डाय ऑक्साईडचे मिश्रण यांचे प्रमाण ६५:३५ असते. मिथेन हा ज्वलनशिल वायु म्हणून उपयोग केला जातो. संयंत्रामध्ये शेण व पाणी यांचे मिश्रण १:१ या प्रमाणात घालतात. बायोगॅस तयार होण्यासाठी २०°c ते ४०°C एवढे तापमान असावे लागते. घरांमधून निघणाऱ्या टाकाऊ पदार्थांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली नाही तर मानवी आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून त्या टाकाऊ पदार्थापासून बायोगॅस. गांडुळखत निर्मिती करणे गरजेचे आहे. बायोगॅसपासून ज्वलनशिल गॅस व चांगल्या प्रतिची मळी (स्लरी) खत मिळते असा दुहेरी फायदा बायोगॅसमुळे होतो. त्याचप्रमाणे नैसर्गिकरित्या (मानवनिर्मित) टाकाऊ पदार्थाची सुद्धा योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. त्यापासून संसर्गजन्य रोग, पाण्याचे अशुद्धीकरण होऊ शकते. या टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट बायोगॅसमध्ये करू शकतो. बायोगॅस निर्मितीसाठी आवश्यक गोष्टी : १. गाईचे (जनावराचे शेण) २. मानवनिर्मित मैला ३. पेंड-जनवरांनी न खाल्लेली पेंड. उदा. : मुहाची पेंड, करंज पेंड इ. ४. स्वयंपाक घरातील टाकाऊ पदार्थ (शिळे अन्न पालेभाज्यांचा टाकाऊ भाग) इ. ५. खादयपदार्थामधील खराब फळे, खादय पदार्थ इ. (सामान्यपणे शेणाच्या तुलनेत मानवनिर्मित मैलाच्या पाण्यात सेंद्रिय पदार्थ कमी प्रमाणात असतात म्हणून गॅसही कमी प्रमाणात मिळत असतो.) बायोगॅसचे फायदे व उपयोग : १. शेणाचा वापर फक्त इंधन (गोवरी) म्हणून केला तर त्या शेणापासून जेवढा फायदा होतो त्यापेक्षा संयंत्रामधून मिळणाऱ्या इंधनाचा फायदा जास्त मिळतो व जास्त सोईस्कर होते व त्यापासून जळण्याची क्षमताही अधिक आहे. २. बायोगॅसमधून निघणाऱ्या मळी (स्लरी) पासून खत मिळते. २७