Jump to content

पान:उर्जा व पर्यावरण.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपक्रमांची निवड करणे: (१) शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ शोषखड्डा करू शकता/ते पाणी बागकामासाठी वापरा. (२) शाळेतील मुतारीजवळ शोषखड्डा करता येईल. (३) गावात हँड पंपाशी शोषखड्डा तयार करता येईल. (४) गावात प्रत्येक घरी प्रकल्पाद्वारे किंवा प्रात्यक्षिकाद्वारे शोषखड्डे तयार करू शकता. अपेक्षित कौशल्ये : (१) शोष खड्ड्याच्या आकाराचे ज्ञान आवश्यक आहे. (२)शोषखड्ड्यास लागणारे विटांचे तुकडे व जाड वाळू किती लागेल याचा अंदाज घ्यावा. (३) विटांचे तुकडे व जाड वाळू यांचे किती जाडीचे थर असावे याची माहिती असावी. (४) शोषखड्डा का करायचा व कोठे करावयाचा हे ठरविता येणे. कृती: (१) जेथे आपले सांडपाणी सोडायचे आहे तेथे १ मी.x१ मी.x१ मी. मापाचा खड्डा खोदून घ्यावा. (२) या खड्ड्यात प्रथम २० सेंमी. जाडीचा वाळूचा थर द्यावा. (३) वाळूच्या थरावर २० सेंमी. जाडीचा विटांच्या तुकड्यांचा थर द्यावा. (४) त्यावर पुन्हा वाळूचा १० सेंमी. जाडीचा थर द्यावा. (५) त्यानंतर सर्व सांडपाणी वाहून खड्ड्यात येईल अशी सोय करावी. विशेष माहिती : (१) जमिनीतील पिण्याच्या पाण्यामध्ये दूषित पाण्याचे झिरपण्याचे प्रमाण कमी होते. (२)दूषित पाणी जमिनीवर पसरल्याने तयार होणारे डास, जिवाणू इ.ला आळा बसतो. (३) दूषित पाणी जमिनीवर पसरल्याने तयार होणारी दुर्गंधी व पर्यायाने होणारे हवा प्रदूषणाला आळा बसतो. (४) शोषखड्ड्यामुळे रोगराई प्रसारास आळा बसून आरोग्य राखले जाते. (५) संडासमधून बाहेर पडणाऱ्या दूषित पाण्याचे योग्य नियोजन राखले जाते. (६) शोषखड्ड्यामध्ये रोजच्या वापरातील कायम उपलब्ध असणाऱ्या वाळू, विटांचे तुकडे इ. वापर करून आर्थिक बाजूंचेही नियमन केले जाते. आकृती शोषखड्ड्याची गरज : घरातून बाहेर पडणारे सांडपाणी सतत जागेवर साचत राहिले तर काही 2- वाळू (जाड) दिवसांनंतर तेथे गटार तयार होते व तेथून दुर्गंधी येते. 7- विटांचे तुकडे तेथे डास तयार होतात व परिणामी रोगराई वाढते. 4-वाळू (जाड) ta-विटांचे तुकडे यासाठी सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे ART14-वाळू (जाड) आहे. शोषखड्ड्याचे फायदे : शोषखड्ड्याद्वारे पाणी जमिनीत जिरण्यास मदत होते व त्यामुळे जमिनीवर डबके साचत नाही. शोषखड्ड्यामुळे परिसर स्वच्छ राहण्यास मदत होते. शिक्षककृती : शिक्षकांनी मुलांना जमिनीवर १ मी.x १मी. आकाराचा चौरस काढून द्यावा. दररोज किती सांडपाणी बाहेर पडते याचा विचार करून शोषखड्ड्याचा आकार ठरवावा. घरगुती शोषखड्डा : आपण मडक्याचा वापर करून छोटा घरगुती शोषखड्डा तयार करू शकतो. मागील कृतीप्रमाणे एक खड्डा खणून तो वाळू व विटांच्या तुकड्यांनी भरून घ्यावा व त्या खड्ड्याच्या मधोमध एक छिद्र पाडलेले मडके ठेवावे व येणारे सांडपाणी पाईपने मडक्यात सोडावे. पाण्यातून येणारा केरकचरा या मडक्यात साचतो. त्यामुळे शोषखड्डा स्वच्छ राहतो. मडके दर दोन आठवड्यानंतर स्वच्छ करावे. संदर्भ : (१) भूगोल, इ. ५ वी, पान नं. ५७-५९, प्रकाशन २००६. (२) सामान्य विज्ञान, इ.५वी, पान नं. २५-३०, प्रकाशन २००६ (३) सामान्य विज्ञान, इ.६वी,पान नं. १२१, प्रकाशन २००७.(४) विज्ञान आणि तंत्रज्ञान, इ.१० वी, पान नं. १४६-१५३, प्रकाशन २००७. 200m 2011 1M 20cm 20cm CIA २६