पान:उर्जा व पर्यावरण.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५) आता रेझिंग रॉड ज्या भागाचे क्षेत्रफळ काढावयाचे आहेत त्या भागात ठेवा व बिंदू मार्क करा. (६) प्लेन टेबल प्रमाणेच बिंदू मार्क करून - प्रमाणाने नकाशा काढून – त्रिकोण बनवून - क्षेत्रफळ काढा. टीप :(१) रेझिंग रॉड अशा बाजूस बसवा की, त्या बाजूचे क्षेत्रफळ काढता येईल... (२) ट्रॅव्हर्स करताना, प्लेन टेबलाची जागा हलविताना उत्तर दिशेशी प्लेन टेबल फिक्स करा. (३) प्लेन टेबल ट्रॅव्हर्स करताना मध्यबिंदू काढा. संदर्भ : (१) भूगोल, इ. ९ वी, पान नं. ४६-४८, प्रकाशन २००६.(२) शिक्षक हस्तपुस्तिका, इ. ९ वी (V-1), पान नं.१६१-१६२. (३) ग्रामीण तंत्रज्ञान, इ. ९ वी , पॅक्टीकल हँडबुक, पान नं. ४७-५०. दिवस : पाचवा प्रात्यक्षिक : शोषखड्डा तयार करणे. प्रस्तावना : आपल्या सभोवतालचे वातावरण म्हणजे पर्यावरण. पर्यावरणातील घटकांचा वापर मानव आपल्या जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी करतो. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या गरजा यामुळे पर्यावरणातील घटकांचा वापर वाढला. निरूपयोगी व घातक पदार्थाचे प्रमाण वाढल्यामुळे सजीवांना आवश्यक असलेले पर्यावरणातील हवा, पाणी, भूमी इत्यादी घटक दूषित होत आहेत. पर्यावरणातील घटकांचा वापर करताना आपण त्यातील उपयोगी असलेल्या पदार्थांचा वापर करतो. आपणास उपयोगी नसलेले पदार्थ आपण टाकून देतो, त्यास टाकाऊ पदार्थ म्हणतात. असे मानव निर्मित टाकाऊ पदार्थ फार काळ एका ठिकाणी साठून राहिल्याने सजिवांना अपायकारक असे बदल पर्यावरणात होतात. त्यास प्रदूषण म्हणतात. प्रदूषणामुळे हवा, पाणी, मृदा दूषित होते. त्यांची गुणवत्ता कमी होते. दूषित हवा, पाणी, मृदा मानवासहित इतर सजीवांच्या आरोग्यास हानिकारक असतात. त्यातून अनेक आजार संभवतात, रोगराई वाढते, सजीवांचे अस्तित्व धोक्यात येते. जैविक विविधतेचा -हास होतो. पर्यावरणाचे संतुलन बिघडते. यामुळेच जागतिक पातळीवर प्रदूषण व पर्यावरणाचे असंतुलन या मानवासमोरील प्रमुख समस्या बनलेल्या आहेत. परिसर हा शब्द आपल्याला माहीत आहे. 'शाळेचा परिसर सुंदर आहे' 'बाजाराचा परिसर घाण झाला आहे अशी वाक्य आपण ऐकली आहेत. परिसर म्हणजे आसपासची जागा. घराच्या, शाळेच्या परिसरापेक्षा गावाचा परिसर अधिक मोठा असतो. परिसरातील प्राणी, वनस्पती, हवा, माती अशा अनेक गोष्टींचा जीवनाशी संबंध येतो. त्यापैकी जल प्रदूषणाची विल्हेवाट लावणे ही आपली अविभाज्य जबाबदारी आहे. म्हणून आपण सर्वांनी या प्रात्यक्षिकाद्वारे शोषखड्ड्याचा अभ्यास करणे हितकारक आहे. उद्देश : शोषखड्डा तयार करणे. साहित्य व साधने : विटांचे तुकडे , जाड वाळू इ. साधने: फावडे, टिकाव , घमेले , पहार, मीटर टेप इ. पूर्वतयारी : (१) सर्व साधने विभागात असल्याची खात्री करा. (२) शाळेत/गावात ज्या ठिकाणी शोषखड्डा तयार करण्याच्या ठिकाणाची निवड करा. (३) शोषखड्ड्यासाठी लागणारे साहित्य गोळा करा. उदा. विटांचे तुकडे, जाड वाळू इ. २५