Jump to content

पान:उर्जा व पर्यावरण.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१cm ->५mxxm= २५ m2 १cm = २५m १cm2 = २५m १७५ cm2 २५ cm १७५ cm2 =? 5 cm ? ___m2 = ४३७५m ४३७५m गुंठे = ४३.७५ उद्देश : शेतजमिनीचा नकाशा काढणे व त्याचे क्षेत्रफळ काढणे. प्लेन टेबल सर्वे साहित्य : प्लेन टेबल, ट्रायपॉड, रेझिंग रॉड, ड्रॉईंग पेपर, पेन्सिल, आकृती : टाचणी, मीटर टेप (३० मी.), यु पट्टी व ओळंबा, ट्रफ कंपास, अॅलीडेड पट्टी इ. याचे गुंठे करूया = १०० कृती: (१) ज्या भागाचा नकाशा काढायचा आहे त्याच्या साधारण मध्यभागी प्लेन टेबल फिक्स करावा. (२) त्यावर ड्रॉईंग पेपर फिक्स करा व उत्तर दिशा निश्चित करा. (३) प्रथम मध्यभागावरून सर्वात दूरच्या बिंदुंचे अंतर नकाशाच्या ड्रॉईंगशीटवर बसेल असे प्रमाण निवडा. प्रमाण ___ निवडताना हिशेब करण्यास सोपे हवे. (४) आता रेझिंग रॉड शेताच्या सीमारेषेवर कोठेही उभा करा व अॅलीडेडच्या साहाय्याने कागदावर रेघ काढा. (५) आता त्या बिंदुचे (रेझिंग रॉड जिथे उभा केला आहे) प्रत्यक्ष अंतर मीटरटेपच्या साहाय्याने मोजा व ___ 'प्रमाणा'प्रमाणे कागदावर बिंदू निश्चित करा. (६) याप्रकारे सीमारेषेवर जास्तीत जास्त बिंदू निवडून त्यांची जागा निवडलेल्या संदर्भबिंदूच्या तुलनेत निश्चित करा. जागा जितकी वेडीवाकडी तेवढे जास्त बिंदूघ्यावेत. (७) आता निश्चित केलेले बिंदू सरळरेषेने जोडा. हा झाला जागेचा नकाशा तयार. हे करून पहा : आपण केलेले काम किती अचूक आहे ते पाहण्यासाठी नकाशावर दाखवलेल्या कोणत्याही दोन ठिकाणांच्या मधील अंतर नकाशावर मोजावे व प्रमाणाप्रमाणे प्रत्यक्ष अंतराचा अंदाज करावा. मग हे अंतर प्रत्यक्ष मोजावे. नकाशावरून काढलेल्या व प्रत्यक्ष मोजलेल्या अंतरात फरक किती आहे हे बघावे. ही त्रुटी साधारण २५-४० सेंमीपर्यंत येईल. जास्त आल्यास सर्व्ह चुकला आहे असे समजावे. फायदा :(१) ही अत्यंत सोपी असून कोणालाही सहज वापरता येण्यासारखी आहे. (२) यातील साहित्य अत्यंत साधे असल्याने मापनातील चुका कमी होतात. उपयोग : (१) शेतीची मोजणी (२) लहान जागेचा नकाशा (३) नालाबंडींग क्षेत्र व इतर इत्यादींसाठी उपयोगी. साहित्य व गरज :(१) प्लेन टेबल- ड्रॉईंग शिट फिक्स करण्यास (२) ट्रायपॉड - प्लेन टेबल फिक्स करण्यास (३) रेझिंग रॉड-ज्या जमिनीचा सर्व्ह करावयाचा त्या जमिनीच्या बिंदुवरती धरण्यासाठी. (४) ट्रफ कंपास-दिशा मार्क करण्यासाठी. २३