________________
संदर्भ : (१) वायरमन - प्रा.प्रकाश शहा, पान नं.९४-९७, प्रकाशन सुधारित आवृत्ती जाने. २००६. (२) शिक्षक हस्तपुस्तिका - इ.९वी (V-3), पान १८०-१८१. (३) शिक्षक हस्तपुस्तिका , इ.९ वी (V-2), पान नं. २३९-२४०. (४) शिक्षक हस्तपुस्तिका, इ.९वी (V-1),पान१५७, सर्व प्रकाशन २००६. दिवस : चौथा प्रात्यक्षिक : प्लेन टेबल सर्व्ह प्रस्तावना: __ पूर्वी जमीन मोजण्यासाठी साखळी पद्धतीचा किंवा दोरीने जमीन मोजण्याची पद्धतीचा वापर करून जमीन मोजली जात असते. अंतर मोजण्यासाठी पूर्वी ब्रिटिश मापन पद्धतीचा वापर केला जाई. उदा. इंच, फूट, मैल. मात्र सन १९७२ पासून सर्वत्र मेट्रिक मापन पद्धतीचा वापर केला जातो. उदा. मि.मी., सें.मी., मीटर, कि.मी. इ. भारतातील सर्व नकाशे तयार करण्याचे काम सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था करते. प्लेन टेबलमुळे जमिनीचे अचूक मोजमाप व नकाशे तयार करता येतात. म्हणून प्लेन टेबल सर्व्हे ही जमीन मोजण्याची पद्धत सर्वत्र प्रचलित आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना मोजमाप व नकाशा तयार करणे सहज समजावून सांगता येते. प्लेन टेबल सर्हेच्या साहाय्याने शेताचे नकाशे, गावातील घरांचे नकाशे तयार करता येतात. दिशा, प्रमाण, सांकेतिक चिन्हांचे ज्ञान विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या जीवनात या ज्ञानाचा सतत उपयोग होतो. नकाशातील दिशा, प्रमाण आणि सांकेतिक चिन्हे हे मुख्य घटक आहेत. विशेष माहिती: • जमिनीचे भूपृष्ठाचे क्षेत्रफळ समजण्याच्या दृष्टीने मोजमाप करणे अतिशय महत्त्वाचे असते. • दिशा, प्रमाण व सांकेतिक चिन्हे असलेल्या रेखकृतीस नकाशा असे म्हणतात. नकाशा परिपूर्ण होण्यासाठी तीन घटक अनिवार्य आहेत. • एखाद्या भूभागाचे सरकारी मोजणी फक्त प्लेन टेबलनेच केली जाते. जमीन उंच सखल व ओढ्या नाल्याची असली तरी तिचे सपाट माप या साधनांमार्फत मिळते म्हणून तिला प्लेन टेबल मोजणी म्हणतात. पूर्व तयारी : (१) प्लेन टेबल सर्व्हे करण्यासाठी लागणारे साहित्य एकत्र जमा करून ठेवा. उदा. ड्रॉईंग शिट, स्केल पट्टी, पेन्सील, शार्पनर, टाचणी, सेट स्क्वे अर, आलेख पेपर इ. (२) प्लेन टेबल सर्व्हे करण्यासाठी लागणारी साधने सुव्यवस्थित असल्याची खात्री करून घ्या. उदा. प्लेन टेबल, ट्रायपॉड, रेझिंग रॉड, मीटर टेप (३० मीटर), यु पट्टीचा ओळंबा, ट्रफ कंपास, अॅलीडेड (दृष्टी) पट्टी, स्पिरीट लेवल इ. (३) ज्या जमिनीचे क्षेत्र मोजायचे आहे. त्या जमिनीची निवड करून ठेवणे. (४) जमिनीची निवड करताना सर्व्हे करण्यासाठी कुठलाही अडथळा नसेल याची दक्षता घ्या. उदा. झाडे झुडपे, इमारती /शेतकऱ्यांमधील वाद. (५) सर्व्ह करण्यापूर्वी प्लेन टेबल सर्हेची सी.डी. विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरवर दाखवा. उपक्रमांची निवड : (१) शाळेचे क्षेत्र प्लेन टेबल सर्व्हेद्वारे मोजणे. २१