Jump to content

पान:उर्जा व पर्यावरण.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिवस : तिसरा प्रात्यक्षिक : अ) एक स्विच वापरून एक दिवा लावणे. N साधे वायरिंग उद्देश : साधे सर्कीट जोडण्यास शिकणे. साधे सर्कीट साधने : स्क्रू-ड्रायव्हर, वायर कटर, टेस्टर, पक्कड इ. साहित्य : स्विच, फ्लेक्झिबल वायर, होल्डर, बल्ब कृती : (१) दिव्याच्या होल्डरला दोन्ही टर्मिनल्सना एक-एक वायर जोडून घ्या (एकूण २ वायर्स जोडल्या जातील) (२) त्यातील एक वायर स्विचच्या एका टर्मिनला जोडून घ्या. (३) स्विचच्या दुसऱ्या टर्मिनलला आणखी एक वेगळी वायर जोडा. (आता पर्यंत एकूण वायर्स वापरल्या जातील.) (४) आता स्विचची कुठेही न जोडलेली वायर फेज लाईनला जोडा. तसेच दिव्याची,आतापर्यंत, कुठेही न जोडलेली वायर न्यूट्रल लाईनला जोडा. (५) होल्डरमध्ये दिवा बसवा. (६) आता स्विच ON (ऑन) केल्यास दिवा लागेल. शिक्षक कृती : प्रथम टेबलावर सर्कीट जोडून दाखवावे आणि नंतर विद्यार्थ्यांना जोडण्यास सांगावे. विद्यार्थी कृती : सर्कीटमध्ये दाखवल्याप्रमाणे शिक्षकाच्या प्रात्यक्षिकानंतर विद्यार्थी स्वतः सर्कीट जोडतात व जोडलेले सर्कीट शिक्षकांकडून तपासून घेतात.. सावधान ! शिक्षकाने स्वतः सर्कीट व वायरिंग तपासल्याशिवाय कोणीही स्विच सुरू करू नये. अत्यंत महत्त्वाचे : स्विच नेहमी लाईव्ह वायरलाच जोडतात अन्यथा करंट बल्बमधून स्विचपर्यंत येऊन थांबतो. अशावेळी बल्ब बदलताना होल्डरमधील पिनांना हात लागल्यास शॉक बसतो. सूचना : १. वायरचे इन्सुलेशन साधारणतः १ सेंमी इतकेच काढावे. २. स्विचमध्ये वायर बसवताना वायर पाठीमागे वळवून बसवावी. टीप : हेच सर्कीट ACN DC या दोन्हींसाठी वापरतात. विद्युत रोधकाची (Resistor) भूमिका उद्देशः (१) विद्युत रोधकाच्या एकसर जोडणीचा अभ्यास करा. (२) विद्युत रोधकांच्या समांतर जोडणीचा अभ्यास करा. १७