________________
230VAC जिना वायरिंग उद्देश : जिना वायरिंगचे सर्कीट जोडण्यास शिकणे. साहित्य : स्क्रू ड्रायव्हर, वायर कटर, टेस्टर, पक्कड इ. सर्कीट: साधने: टू वे स्विच वायर, होल्डर, बल्ब इ. AL1 कृती: (१) होल्डरच्या दोन्ही टर्मिनल्सना वायर जोडून घ्या. फ्लेक्झिबल वायर घ्या. (२) उर्वरित सर्कीट नेहमीप्रमाणे जोडून घ्या, (३) कटरने कापून इन्शुलेशन (गरजेपुरते) काढा, जिना वायरिंगचे सर्किट (४) आलेला सप्लाय टू वे स्विचच्या मधल्या टोकाला जोडा. (५) यातील एक वायर न्यूट्रल म्हणून वापरा. तर दुसरी वायर टू वे स्विचमधल्या टोकाला जोडा. डी.सी./ए.सी.करंट : एकाच दिशेने वाहणाऱ्या करंटला डी.सी. (डायरेक्ट करंट) म्हणतात. या प्रकारचा करंट बॅटरीतून मिळतो. जेव्हा करंट थोड्या प्रमाणातच हवा असतो तेव्हा ड्राय सेल (बॅटरी) चा वापर करतात. ज्या प्रवाहाची दिशा व किंमत एका सेकंदात ठराविक वेळा बदलते त्यास अल्टरनेटिंग करंट (ए. सी.) असे म्हणतात. सध्या व्यवहारात व घरातील वायरिंगसाठी हाच प्रवाह वापरतात. ज्या वस्तुतून वीज वाहत नाही त्यांना इन्शुलेटर म्हणतात. तर ज्यांच्यामधून वीज अगदी सहज वाहते त्यांना गुड कंडक्टर म्हणतात, ML गुड कंडक्टर इन्श्यु लेटर शिक्षक कृती: येथे शिक्षकाने फक्त टेबलावर सर्कीट जोडून दाखवावे. वीज : वीज म्हणजे इलेक्ट्रॉनचा प्रवाह. उपयोग : टू वे स्विच वापरल्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून दिवा चालू-बंद करता येतो. १. खोलीच्या आत-बाहेर २. जिनाच्या वर खाली. संदर्भ : मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख V-1, इ. ९ वी, पान क्र.१४८-१४९, प्रकाशन २००६.