पान:उर्जा व पर्यावरण.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

असते. या मशीनच्या साहाय्याने लाकडावर, लोखंडावर तसेच सिमेंट, काँक्रीटला छिद्रे पाडता येतात. त्यासाठी वेगवेगळे ड्रील वापरतात. काँक्रिटला छिद्र पाडण्यासाठी काँक्रीट बीट (डायमंड टीप्ड बीट) वापरतात. इलेक्ट्रिकल ड्रिल मशीनने कमी वेळेत व कमी श्रमात छिद्रे पाडता येते. निगा व काळजी :(१) मशीन वापरताना चकमध्ये ड्रिल मशीन बीट घट्ट बसवावे. (२) छिद्र पाडताना ड्रिल मशीन सरळ धरावी (३) कामाच्या स्वरूपानुसार योग्य प्रकारचे ड्रिल बीट वापरावे. (४) आवश्यकतेपेक्षा जास्त दाब देऊ नये. (५) मशीन वापरताना दरवेळी ते सुरक्षित आहे ही खात्री करा. प्रात्यक्षिक : ब) वायरिंग, लाईट कंट्रोल (हॉस्पिटल वायरिंग) प्रस्तावना : आपण घरामध्ये, शाळेमध्ये, दवाखान्यात, बँकमध्ये, वेगवेगळ्या कार्यालयामध्ये वायरिंग केलेले बघतो. स्विच दाबले की लाईट लागते. फॅन फिरतो, स्वीच दाबले की वेगवेगळी उपकरणे सुरू होतात. मात्र ठराविक ठिकाणची वायरींग त्या ठिकाणाच्या सोयीनुसार केली जाते. अशा वायरिंगमुळे मानवी काम सोपे होते व अपघात टळू शकतात. आपण जीना वायरिंग व लाईट कंट्रोल (हॉस्पिटल वायरिंग) शिकून घेणार आहोत. त्याआधी काही महत्त्वाच्या संज्ञा शिकून घेऊया. काही महत्त्वाच्या संज्ञा: १. विद्युत प्रवाह(I) : विदयुत मंडळात इलेक्ट्रॉन्सच्या होणाऱ्या वहनास इलेक्ट्रॉन प्रवाह म्हणतात. विद्युत प्रवाह हा इलेक्ट्रॉन प्रवाह चालू झाल्यावर बरोबर त्याच्या उलट दिशेने जातो असे म्हटले जाते. व तो अॅम्पीअर या एककात मोजतात. उदा. : 10A, 15A. २. विदयुत दाब (v) : विदयुत मंडळात इलेक्ट्रॉन्सचे वहन होण्याकरिता जो घटक प्रेरणा देतो, त्याला विदयुत दाब असे म्हणतात. हा विदयुत दाब व्होल्ट या एककात मोजतात. उदा. 230V, 440V. ३. विदयुत शक्ती (w) : विदयुत मंडळात विरोधाजवळ कार्य घडण्याच्या गतील विद्युत शक्ती म्हणतात. ही वॅट या एककात मोजतात. उदा. 15W, 100W. ४. विदयुत विरोध (R) : विद्युत मंडळात इलेक्ट्रॉन्सचे वहन होत असताना जो घटक अडथळा निर्माण करतो त्यास विदयुत विरोध असे म्हणतात. हा विरोध ओहम या एककात मोजतात. उदा. 52, 102. नळीतून पाणी वाहते व तारेतून वीज यात पुष्कळ साम्य आहे. तारेतील इलेक्ट्रॉन्सच्या साहाय्याने ऊर्जा वाहते. ऊर्जेचा वापर ज्या उपकरणात करायचा आहे. तिथे ऊर्जा पोहचल्यावर, रिकामे इलेक्ट्रॉन्स हे परत मूळ ऊर्जा स्रोताकडे परत पाठवले जातात. त्यामुळे वीज वाहण्यासाठी विद्युत सर्कीट पूर्ण व्हावे लागते. एका सेकंदात ६.२५४१० इलेक्ट्रॉन्स जर सर्कीट मधून वहात असतील तर त्या प्रवाहाला १ अॅम्पीअर प्रवाह म्हणतात. जीना वायरिंग व लाईट कंट्रोल (हॉस्पिटल वायरिंग) वायरिंग शिकत असताना आपल्याला खालील प्रकारच्या साहित्य व साधनांची गरज भासते. साहित्य : टू वे स्विच, विविध रंगाच्या वायर, होल्डर, बल्ब. साधने: स्क्रूड्रायव्हर, वायर कटर, पक्कड, टेस्टर. पूर्व तयारी :(१) प्रात्यक्षिक करत असताना प्रत्येक गटात ३ ते ४ विद्यार्थी याप्रमाणे गट करून जिना वायरिंग व लाईटकंट्रोलची सर्कीट बोर्ड तयार करून घ्यावे. (२) प्रात्यक्षिकासाठी लागणारी साहित्य व साधने आपल्याजवळ असल्याची खात्री करून घ्यावी. १४