पान:उर्जा व पर्यावरण.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२) मार्फा (रास्प कट फाइल) : लाकडावर घासकाम करण्यासाठी ही फाइल वापरतात. याचे दाते विरळ व उंच टोकेरी असतात. त्याने या फाइलने जास्त प्रमाणात मटेरिअल काढता येते. पण दाते उंच असल्याने कठीण धातूवर घासल्याने खराब होतात, म्हणून फाइल धातूवर वापरत नाहीत. साधारण १५ ते २० से.मी. लांब असते. (१३) टोच्या (पोकर) : लाकडावर स्क्रूला पकड मिळण्याकरिता बारीक छिद्र पाडण्यासाठी याचा उपयोग होतो. असे छिद्र पाडल्यामुळे लाकडावर स्क्रूला योग्य जागी बसविता येतो व पिळण्यासाठी कमी श्रम लागतात. याचे पाते गोल किंवा चौकोनी असून पुढचे टोक टोकदार असते व पाते लाकडी मुठीत बसविलेले असते. साधारणपणे याच्या पात्याचा आकार १५ सें.मी. लांब असतो. लोखंडी भागावर पोकरचा वापर करू नये. (१४) गिरमीट (जिमलेट) : लाकडी बोर्ड किंवा ब्लॉकवर छोटी छोटी छिद्रे पाडता येतात. या लाकडाच्या साहाय्याने अधिक लांबीची छिद्रे पाडता येतात. या टोकावर असलेल्या आडव्या लाकडी मुठीवर जोर लावून हत्यार फिरवता येते. साधारणपणे याच्या पात्याचा आकार १५ सें.मी. लांब असतो. लोखंडी भागावर याचा वापर करू नये. (१५) रॅचेट ब्रेस : लाकडाला अडचणीच्या ठिकाणी छिद्र पाडण्यासाठी याचा उपयोग होतो. (१६) हँड ड्रिल मशीन : हे हाताने फिरवून लाकडात छिद्रे पाडण्याचे यंत्र आहे. यामध्ये हँडलच्या साहाय्याने गिअर फिरतो, त्यामुळे चक फिरतो. चकमध्ये ड्रिल बीट बसवलेले असते. बीटचा वेग गिअरच्या साहाय्याने हँडलच्या वेगापेक्षा वाढविला जातो. चकमध्ये जितक्या जास्तीत जास्त व्यासाचे ड्रिल बीट असू शकते त्यास मशीनची कॅपॅसिटी म्हणतात. साधारणपणे ६ मि.मी. व्यासाचे छिद्र पाडता येते. निगा व काळजी: (१) मशीनच्या सर्व फिरणाऱ्या सर्व भागांवर तेल टाकावे. (२) ड्रिल बीट चकमध्ये घट्ट बसवावे. (३) छिद्र पाडण्यापूर्वी पोकरने खूण करून घ्यावी. (४) छोट्या ड्रिल बीटवर जास्तीचा दाब देऊ नये. (५) ड्रिल मशीन वापरताना सरळ धरावे. (१७) रावल पंच : काँक्रीट व विटांच्या भिंती, स्लॅब (छत) यांना छिद्र पाडण्यासाठी रावल पंचचा उपयोग होतो. याचे होल्डर व बीट असे दोन भाग असतात. आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या जाडीचे रावल पंच बाजारात मिळतात. त्याची जाडी नंबरवरून ८,१०,१२,१४,१६ नंबरच्या जाडीचे होल्डर बीट उपलब्ध आहे. रावल पंचने छिद्र पाडल्यावर छिद्रात रावल प्लग किंवा पाचर बसवून स्क्रू बसविता येतो. निगा व काळजी : पंचच्या साहाय्याने छिद्र पाडताना - (१) पंच भिंतीला काटकोनात धरावा. (२) त्यावर हातोडीने ठोकावे. (३) प्रत्येक ठोक्याला पंच गोल फिरवा म्हणजे तो अडकणार नाही. (४) बीट खराब झाल्यास नवीन वापरावे. (१८) इलेक्ट्रिक ड्रिल मशीन : रावलपंचच्या साहाय्याने छिद्र पाडताना छिद्र योग्य आकाराचे राहात नाही, भिंतीचे प्लास्टर खराब होते, छताला नीट छिद्र पाडता येत नाही, वेळ व श्रम जास्त लागतात, म्हणून इलेक्ट्रिक ड्रिल मशीनचा वापर करतात. हे ड्रिल मशीन पोर्टेबल असून इलेक्ट्रिकल मोटरच्या साह्याने यातील चकला गती दिली जाते. हे सिंगल फेज ए.सी. प्रवाहावर काम करते. मशीन चालू बंद करण्यासाठी याच्या मुठीमध्ये एक स्विच १३