Jump to content

पान:उर्जा व पर्यावरण.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८) हॅक सॉ : हॅक सॉ सुतारकामातील करवतीपेक्षा वेगळी असून लोखंड किंवा धातू कापण्यासाठी वापरतात. एका लोखंडी फ्रेममध्ये विंगनटाच्या साहाय्याने हॅक सॉ ब्लेड बसविलेली असते. फ्रेमवरून हॅक सोंचे सांधी फ्रेम व अॅडजेस्टेबल फ्रेम असे दोन प्रकार आहेत. साध्या फ्रेममध्ये एकाच लांबीचे तर अॅडजेस्टेबल फ्रेममध्ये वेगवेगळ्या लांबीच्या ब्लेडस् बसविता येतात. लोखंड कापण्यासाठी हाय स्पीड स्टीलच्या ब्लेड वापरतात. ब्लेडची लांबी २० ते ३०सें.मी. असते. कॉन्ड्यूट पाईप, केबल, लोखंडी पट्ट्या, पत्रे कापण्यासाठी हॅक साँचा उपयोग करतात, निगा व काळजी :(१) विंगनटच्या साहाय्याने ब्लेड पुरेसे घट्ट बसवावे. पाते सैल राहिल्यास तुटते. (२) फ्रेमला पाते बसवताना दात्याची टोके पुढच्या बाजूला असावीत. (३) कापताना कुलंटचा वापर करावा. (४) कापतेवेळी हॅक सॉ सरळ चालवावी. (९) चाकू (इलेक्ट्रिशिअन नाइफ) : या चाकूचा उपयोग तारांवरील इन्सुलेशन काढण्यासाठी होतो. साधारणतः ५ सें.मी. लांबीचा असतो. निगा व काळजी : (१) चाकूला आवश्यकतेनुसार धार असावी. (२) चाकू वापरताना हातांना जपा. (३) तारा कापण्यासाठी वापरू नये. (४) तारांचे इन्शुलेशन काढताना त्यांना ओरखडे/चरे पडू नये (१०) पटाशी (फर्मर चिझल) : याचा उपयोग लाकडी बोर्ड, ब्लॉक्स बटन इ. लाकडी भागांवर खाचा पाडण्यासाठी होतो. ६,१२,१८,२५ मि.मी. रुंदीच्या व १५० ते ३५० मि.मी. लांबीच्या पटाशी वापरतात. निगा व काळजी: (१) पटाशीच्या पात्याला योग्य प्रकारे धार काढलेली असावी. (२) पटाशीच्या मुठीवर मॅलेटने ठोकावे. (३) धातुवर पटाशीचा वापर करू नये. (११) कानस (फाईल): धातुचे घासकाम करण्यास विविध प्रकारच्या कानस वापरतात. फाईल आकारावरून फ्लॅट (चपटी), स्क्वेअर (चौरस), ट्रेंग्युलर (त्रिकोणी), राऊंड (गोल), हाफ राऊंड (अर्ध गोल) हे प्रकार आहेत. फाईल्सच्या दर इंचात असणाऱ्या दातांच्या संख्येनुसार फाईल्सची ग्रेड (दर्जा) निश्चित होते. या ग्रेडनुसार फाइलचे (१) रफ फाइल (२) बास्टर्ड फाइल (३) सेकंद कट फाइल (४) स्मूथ फाईल (५) डेड स्मूथ फाईल हे प्रकार आहेत. कामाच्या स्वरूपात योग्य आकाराची व योग्य दर्जाची फाइल वापरतात. १२