पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

o, o उत्तररामचरित्र नाटक, भांटुा०-ह्यांतकाय संशय? तेच. o सौधा०-मी ह्मटळे की, हा कोणी वाघ आहे, किंवा लांडगा आ हे. कोणजाणे. * भांडा०-ऑ-काय ? काय ह्मटले? सैौधा०-नाही, ह्मटले. त्याने येताक्षणीच अगोदर आमच्या गुरुच्या घरची बिचारी कालवढ मटकावली. ह्मणून मला संशय आला. भांडा०-अरे, अतिथीला मांसानें मधुपर्क करावा असें शान्त्र आहे. झणून कोणी श्रेष्ठ अतिथि आपल्या घरीं आला असतां गृहस्थाश्रमी न्याला कालवड किंवा गेोन्हा अथवा बीकड मारुन त्याचे मांस देतात. ह्याकृत्यास धर्मशास्र कर्त परमधर्म असें मानितात. सौधा०-तरमग तूं येथे बोलण्यांत सांपडलास. भांडा०--कप्तरेि सांपडली.? सैौधा०-सांगती ऐक कसातो. श्रेष्ठ अतिथि आला असतां मांसार्ने मधुपर्क करण्याचा सांप्रदाय आहे. लणून वसिष्ठ स्वामी आले त्यांकरितां कालवड मारिली ह्मणतोस. असेो,पण नुकताच राजऋषिजनक आला होता त्याला अामच्या वारमीकि गुरुंनी दही आणि मध ह्यांनीच मधुपर्क केला, कालवड मारिली नाहीं हैं कसें. भांडा०-अरेबाबा, ज्यांनी मांससोडले नार्ह त्यांचाविधि वेगळा, आणि ज्यांनी मांससोडले त्यांचा विधिबेगळा, जनसांप्रत मांसभक्षण वज्र्य केले आहे. ह्मणून त्याला रहीं मध ह्यांनीच मधूपर्क केला समजलास? संौधा०-केोणच्या कारणानें त्यानें मांस सेोडलें?