पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रस्तावना. धारानामक राजधानीत भोजराजाजवळ बहुत पंडित होते, त्यात कालिदासाच्या बरोबरीचा भवभूति ह्यानावे एक महा विद्वान् कवि होता. त्याने संस्कृत भाषेत तीन उत्तम नाटकें केलीं. एक मालतीमाधव, एक वीरचरित्र, आणि एक उत्तररामचरित्र. त्यांत उत्तररामचरित्र हें नाटक विशेषेकरुन विद्वानांस मान्य व रसिकजनांस प्रिय असे आहे. नाटकाचे जे गुण ते सर्व ह्या नाटकांत कवीनें आणिले आहेत. परंतु हा ग्रंथ संस्कृत भाषेत आहे ह्मणून त्यांतील रस संस्कृत भाया जाणणा-या पुरुषांस मात्र प्राप्त होते. प्राकृन जनांस दुर्लभ. तो सर्वांस प्राप्त व्हावा ह्या उद्देशानें त्या नाटकाचे हे मराठी भाषांतर केले आहे. त्या कवीनें जो आपल्या ग्रंथांन रस उभा केला आहे तसा रस साधणें इतरांस फार कठीण आहे. तथापि यथामति साधवला तितका साधला आहे. आता याहून उत्तम प्रतीचे भाषांतर होई तोपर्यंत हें हाती घेण्यास रसिकजन अनमान करणार नाहीत अशी ह्या भाषांतर कर्त्यास आशा आहे. संस्कृत भाषेच्या आंगीं शब्दप्रौढी, शब्दलालित्य, अर्थप्रौढी ,अर्थलालित्य , अर्थगांभीर्य, मनोरंजकता, इत्यादि गृण आहेत, तसे ह्या मराठी भाषेत नाहीत, ह्यामुळे, आणि कविताशक्ति