इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य यामुळे सत्त्वहीन देवांवरून अधिक प्रभावी देवांकडे त्यांची भक्ति वळली आणि या भक्तीचे फलही पण त्यांना मिळाले. ठाणेश्वर, मथुरा, सोमनाथ वगैरे ठिकाणच्या मंदिरांतून युगानुयुगे लक्षावधि हिंदु पूजा-उपासना-करीत असत. मंदिराच्या पुरोहितांनीं कल्पनेपेक्षा किती तरी विपुल संपत्ति सांठविली होती. परमेश्वर दीन पतितांचे संरक्षण करतो अशी श्रद्धा लोकांमध्ये निर्माण करून त्यांनी ही जनतेपासून लूटच केली नव्हती का ? महंमदाच्या लुटीमुळे श्रद्धेचा हा दिव्य प्रासाद जणू पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे एका क्षणांत कोसळून पडला. महंमदाचे सैन्य जवळ येतांच पुरोहितांनी सांगितले की, देवाच्या क्रोधांगारांत शत्रूची रक्षा होऊन जाईल. लोकांना चमत्कार घडेल असे वाटले होते. परंतु अरेरे ! कांहींच घडलें नाहीं. उलट शत्रूच्या देवानेच चमत्कार घडविला. अर्थात् श्रद्धेची ज्योत महान् चमत्काराने आकृष्ट केली. धर्मप्रामाण्याचे दृष्टीने विचार करतां ज्यांनी त्या वेळीं मुसलमानी धर्म स्वीकारला तेच खरे धार्मिक होते. सद्यःस्थितींत उपयुक्त अशी मीमांसा विजयाची अंतर्बाह्य चिकित्सा करणे हे आजही अत्यंत फायद्याचे आहे. सनातनी हिंदूला पूर्वदुष्ट ग्रहामुळे कोठलाही मुसलमान अत्यंत हीन वाटतो, तो वाटणार नाहीं. पूर्वकल्पनांचा निरास होतांच हिदूना मुसलमानी विजयाच्या विधायक स्वरूपाचे महत्त्व तेव्हांच कळेल. जत्याबद्दल असणा-या मत्सराचा जितांना त्याग करता येईल. अशा त-हन ऐतिहासिक ज्ञानाने दृष्टि निवळून मुसलमानांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण पूर्ण पालटल्याशिवाय हिंदुस्थानांतील जातीय तंटयाचा प्रश्न सुटणार नाहीं. जुन्या संस्कृतीच्या विनाशकाळी गोंधळातून बाहेर निघण्यास मुसलमानी धर्माने केलेल्या मदतीचे महत्त्व ओळखल्याशिवाय हिंदूना मुसलमान आपल्या राष्ट्राचे घटक आहेत ही दृष्टि पालटतां येणार नाही. शिवाय मुसलमानांच्या विजयाचे योग्य कारण १०४
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/99
Appearance