पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी तत्त्वज्ञान असे कांहीं आहे अशी कल्पना उदय पावली, त्यामुळे स्त्रिस्ती धर्माच्या आधारावरच हल्ला चढला. जर सर्व धर्माचे मुळाशीं तीच मुख्य तत्त्वे असतील तर ज्या गौण तत्त्वांचे योगाने मानवाचे आध्यात्मिक ऐक्याला बाधा येते असे सर्व अविश्वास्य सिद्धांत सोडून देणेच इष्ट नव्हे का ? पण असल्या सिद्धांतांशिवाय-बुद्धीच्या कसोटीला न टिकणारा-धर्म उभाच राहू शकत नाही. त्याला बुद्धिप्रधान बनवा-- वयाचा तर त्याचे अस्तित्व टिकणारच नाहीं. सर्व धर्माचे उगमस्थान एकच आहे हें क्रांतिकारक तत्त्व अरव विचारवंतांचेच आहे. अॅव्हेरोजच्या विचारांनी अरब विद्येवर कळस चढविला हे खरें ! परंतु नवव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत जी श्रेष्ठ श्रेष्ठ विचारवंतांची व तत्त्वज्ञान्यांची परंपरा होऊन गेली त्यांपैकीं अॅव्हेरोज हा एक होता. इतर श्रेष्ठ विचारवंतांच्या विचारसरणीचा उल्लेख येथे करणे अस्थान होणार नाही. त्यायोगाने मुसलमान धर्माच्या मुख्य व मूळ तत्त्वांतून ज्या क्रांतिकारक विद्येचा विकास झाला तिची थोडीशी कल्पना येईल. स्वतंत्र विचार आध्यात्मिक अद्वैताचे जणू प्रतिबिंबच ऐहिक ऐक्यस्थापनेत झालें. त्यामुळेच आर्थिक समृद्धि झाली. मग या नवोदित मुसलमान राष्ट्राने मनोविकास व संस्कृति यांकडे लक्ष दिले. सुमारे एक शतक त्यांनी इतरांपासून-प्रामुख्याने ग्रीक लोकांपासून-घेण्यासारखे काय आहे ते पाहून त्याचा अभ्यास केला. आणि अशा त-हेनें “ हुश्शार' होतांच स्वतःचे स्वतंत्र विचार विद्येच्या प्रत्येक शाखेत निर्माण केले. अरबी तत्त्वज्ञ अल् कंदी हा स्वतंत्रप्रज्ञ अरबी तत्त्वज्ञान्यांचा आद्य पुरुष होय. आबासादीच्या राजधानींत तो राहात असे. नवव्या शतकाचे सुमा