Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी तत्त्वज्ञान अगदी काळजीपूर्वक पाहून गिबनचे मत असे झाले आहे कीं : “मुसलमानांच्या सनातन न्यायाशीं विरोधी अशीच ती कडक शिक्षा होती. मुसलमानी नियमांत हे स्पष्ट आहे की, ज्यू आणि ख्रिस्ती लोकांची युद्धांत मिळालेली पुस्तकें : अग्नये स्वाहा' करावयाचीं नाहींत; आणि काफीर शास्त्रज्ञ, इतिहासकार, कवि अगर शरीरविज्ञानी आणि तत्त्वज्ञानी यांच्या पुस्तकांचा अगदी योग्य तो उपयोग करून घ्यावयास कांहीं हरकत नाहीं " (रोमन साम्राज्याचा उदयास्त.) निपक्षपाती टीकेसहित इतिहास लिहिण्याची प्रथा सुरू झाल्यापासून ही ग्रंथदहनाची गोष्ट खोटी किंवा अत्यंत संशयास्पद समजली जाते. कसेही असो. अरबांच्या आक्रमणापूर्वीच ग्रीक विद्येचा निधि या लायब्ररींतून नाहींसा झाला होता. त्यापूर्वी पुष्कळ दिवस शास्त्रीय ज्ञान व तत्त्वनाज्ञात्मक दृष्टि याऐवजी ख्रिश्चन दुरभिमान अलेक्झेंड्रियांत भरून राहिला होता; आणि म्हणूनच ग्रंथशाळेतही तदनुरूप फरक झाला असावा. ख्रिश्चन छळामुळे ज्यांनी ते विद्यापीठ सोडले अशा यवन विद्वानांनी त्यांना अमोल वाटणारा तो ठेवा नलाच असला पाहिजे; व ज्या धर्मशास्त्राच्या ग्रंथांनीं हिताहून अहितच अधिक केले होते अशा ग्रंथांनीच बहुतेक ओमरच्या हुकुमामुळे अग्निकाष्ठे भक्षण केली असतील. मुसलमानी अग्नींने धर्मशास्त्राच्या या ग्रंथांची आहुति घेतली नसती; परंतु स्वतंत्र विचाराच्या पुरस्कर्त्या खलिफांनी जुन्या विद्येवरील सर्व उपयुक्त ग्रंथ ज्या तीव्र उत्सुकतेने गोळा करून त्यांचे संरक्षण केले होते; त्याच उत्सुकतेने कदाचित् निरुपयोगी व विघातक ग्रंथांचे बळी घेतले असतील. ख्रिस्ती संतांचा संताप | टॉलमीजचे कार्य बायझंटाइनच्या रानटीपणामुळे अकार्य झाले होते. हिपारिआच्या यात्रेत विद्यादेवीचा सेंट सिरिल याने ज्या वेळी अपमान केला तेव्हांच अलेक्झेंड्रियाच्या विद्यापीठाच्या विनाशास आरंभ झाला ८५