अरबस्थानच्या उजाड, रखरखीत वाळवंटांत जगांतील फार मोठ्या मानव समाजास शांतीचा शीतल संदेश देणारा धर्मसंप्रदाय उदयास आला, ही या विश्वांतील विस्मयजनक घटना होय. दया, उदारता आणि बंधुता हे थोर गुण सामाजिक जीवनांत ओतप्रोत भरून टाकण्याचें कार्य या धर्मसंप्रदायानें केलें.अगदींन सामान्य मानवांना सहज आकलन करता येईल, इतका सोपा मुसलमान धर्म आहे. खलीफा व श्रद्धावान निग्नो यांच्यांत या धर्माच्या छत्राखालीं सारखेपणाची भावना निर्माण झाली. उपनिषदांतील गंभीर तत्त्वचर्चा, गौतम बुद्धाची बौद्धिक श्रेष्ठता, व्यासाच्या भारतांतील वैविध्यपूर्णवैचित्र्ययक्त-विश्वाचें व मानवी आयुष्याचें प्रगल्भ विवेचन, बायबलमधील उदात्त नैतिक उपदेश व चिनी तत्त्ववेत्त्यांचें सामाजिक व्यवहाराचें निरीक्षण कुराणांत सांपडत नाहीं, हे खरे; पण या धर्मानें जगाला सरळपणाचा व्यवहार शिकविला. कुराणाचे संदेश म्हणजे ईश्वराचे औदार्यपूर्ण निश्वास आहेत. त्यांत दिव्यत्वाऐवजीं मानव्य आहे. त्यांत गहनता नाहीं, सुगमता आहे. इस्लामच्या उदयापूर्वीचे समाज व इस्लामच्या प्रभावाने निर्माण झालेला उत्तरकालीन समाज यांची तुलना केल्यास इस्लामनें क्रौर्य व जुलूम यांतून मुक्त असा समाज निर्माण केला. यहुदी धर्म, ख्रिश्चन धर्म व झरतुष्टाचा धर्म है। जगांतील प्रसिद्ध धर्म इस्लामचे अगदी निकटचे शेजारी होते. किंबहुना इस्लामच्या उदयापूर्वी कित्येक शतकें अरबांच्या कानाशी या धर्माचे उपदेश हितगुज करू लागले होते. पण यहुद्यांच्या धर्मात एक विशिष्ट ज्यू मानव वंशच देवाचा लाडका झाला. सगळ्या मानवांना सारखी जागा त्यांत नव्हती. पारशांच्या धर्मात मानवाच्या आपसांतील
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/8
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्र स्ता व ना
७