पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण सहावें इस्लामी तत्त्वज्ञान अरबी विद्यांच्या विकासाचा काळ ५०० वर्षे होता. हा काळ यूरोपच्या इतिहासांतील अगदी कृष्णयुगच होते. याच काळांत ब्राह्मणवर्चस्वाच्या प्रतिक्रियेमुळे हिंदुस्थान अगदीं स्वस्थ होता. बुद्धधर्म विकृत होऊन गेला होता. बुद्ध-क्रांति थोपविल्यामुळेच मुसलमान हल्ल्याला हिंदुस्थान बळी पडला. आबासादी, फातिमा आणि ओमिएद यांच्या राज्यांत विद्या आणि संस्कृति यांची अनुक्रमें आशिया, उत्तर आफ्रिका व स्पेन यांमध्ये अत्यंत जोराची प्रगति झाली. समरकंद-बखारापासून ते फेजकोरडोवापर्यंत अनेक विद्वान् खगोलशास्त्र, गणित, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, वैद्यक आणि संगीत यांचा अभ्यास करीत असत. ख्रिस्ती धर्माच्या असहिष्णु व भ्रममूलक धोरणामुळे ग्रीक तत्त्वज्ञान व विद्या यांचा लोप झाला होता. अरबांचा उदय झाला नसता तर कदाचित् मनुष्य जात त्या ठेव्याला कायमची मुकली असती. अज्ञानाचा निरास निरर्थक धार्मिकता व ढोंगी पावित्र्य यांमुळे स्त्रिस्ती धर्माने जुन्या शास्त्राची प्रगति कुंठित केली. या अज्ञानी दुरभिमानाचा परिणाम म्हणजे युरोपांतील लोक अगाध व अनंत अज्ञानांधकारांत बुडण्याची भीति होती. परंतु सुदैवाने ग्रीक विद्येच्या पुनरुज्जीवनाने अज्ञान, लोकभ्रम, दुराग्रह यांचा नाश केला व युरोपमधील लोकांना ऐहिक वैभव, बौद्धिक प्रगति व आध्यात्मिक मुक्ति यांचा मार्ग दाखविला. आधुनिक बुद्धिवादाच्या पुरस्कर्त्यांना अरब तत्त्वज्ञान्यांकडून व शास्त्रज्ञांकडूनच ६ ८१