पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विजयाची कारणपरंपरा व आफ्रिका खंडाच्या जीवनाचे प्रश्न अधिक गंभीर झाले होते. जित राष्ट्रांतील सामाजिक दुःस्थितिच राजकीय उलथापालथीच्या मुळाशीं होती. त्यांच्या परंपरागत धर्माचे महत्त्व पुष्कळ काळ आधीच संपलें होते. धर्माचे स्थान पुराणांनी घेतले होते. उघड गोष्टींचा उकाला करणे ज्यांना अवघड वाटते, त्यांना गूढ गोष्टी कशा आकलन होणार? परंतु त्या गूढ तत्त्वावरच मनुष्याचे बंधमोक्ष अवलंबून असतात हे शिकविण्यात आले होते. व्यक्तीच्या गुणावगुणांचा कांहीं उपयोग होत नाही हे त्यांच्या प्रत्ययास येत होते. पापाचे माप दुष्कृत्यावर अवलंबून नसे, तर नास्तिकपणाचे प्रमाणांत पापाचा लहानथोरपणा गणला जात असे. बिशप लोक, खून, विषप्रयोग, व्यभिचार, दंगेधोपे करतांना नेहमीच आढळत. बुद्धिस्वातंत्र्याच्या बाजूने बोलण्याचे वेळीं कुलपती व ग्रामपती यांचा आवाज तोंडाबाहेर फुटेल तर शपथ ! वैताग व औदासीन्य याशिवाय याचा दुसरा काय परिणाम घडणार ? ज्या पद्धतींत हृदयाकडे दुर्लक्ष होते ती पद्धति कोणाच्या हृदयांत ठाव । घेऊ शकेल ? समतेची घोषणा अशा पडझडीचे वेळीं व सर्वत्र अराजकता माजली असतांना ' देव एकच आहे' असा ध्वनि सर्व जगांत उठतांच सर्वत्र शांतता व्हावी यांत नवल ते काय ? सर्व आशिया व यूरोप या धर्माच्या छत्राखाली आला. चांगल्या काळांत देशभक्ति ही धर्माहून हीन आहे असे शिकविले जाते; त्या वेळी ती तर नष्टप्राय झाली होती. महंमदाने शिकविलेल्या समतेच्या तत्त्वाचा उगम फिरत्या आयुष्याच्या पारंपारिक स्वातंत्र्यांत आहे. लुटालुटीच्या धंद्यांत सर्वांनीं समान साहस प्रगट केले होते. याच सामान्य लुटालुटीच्या धंद्याला विजयाचे सामान्य स्वरूप आल्यावरही कोणा अरबास आपला घोडा किंवा तरवार यांचे तेज इतर कोणाही अरबाच्या घोड्यापेक्षां अगर ६७