ऐतिहासिक व सामाजिक पाश्र्वभूमि ताबा मिळविला होता. अशा स्थितींत आर्थिक उन्नतीची पावले पुढे पडतील अशा नवीन उदयिष्णु धर्माचे सार, राष्ट्रांतील मुख्य घटकांच्या बुद्धीने आकलन करावे हे अगदी सहज आहे; आणि म्हणूनच हम कुटुंबांतील लोक नवीन धर्माचा आदेश लोकांना देऊ लागले. क्रांतीची धुरा एकदां का हशेम आणि कोरेश नवीन धर्माचे अनुयायी बनले की सर्व राष्ट्र तात्काल त्या धर्माचे अनुयायी बनले असते. सर्व टोळ्यांनीं मक्केस येणे आवश्यक होते. ज्यांच्या हातीं मक्केचा व्यापार होता त्यांना नवीन धर्माचा आदेश देणे सुलभ होते. परंतु पूर्वग्रह आणि मत्सर यांमुळे कोरेश लोक आपल्या बांधवांच्या छळास उद्युक्त झाले. त्यांना वाटले की मक्केचा व्यापार आफ्रिकेकडे वळेल आणि काबाचे सामुदायिक उपासना-मंदिर नाहींसेच होईल. परंतु क्रांतीची धुरा वाहण्याचे एकाचे कर्तव्य चुकले तर दुसरा ते पुढारीपण घेण्यास तयार असतोच. मदिनेमध्ये महंमदाच्या कार्यास जोराचा पाठिंबा मिळाला व ऐक्याच्या आवाहनास राष्ट्राने तात्काल ओ दिली. कोरेशांनी चालविलेल्या संस्कृति संरक्षण करण्याच्या धोरणास । विटून त्यांच्यापैकीच पुष्कळ कुटुंबे क्रांतिकार्यास मिळाली. लवकरच कोरेश शरण आले आणि त्याच वेळी त्यांना “ धर्मसंरक्षकाचा दंड ' मिळाला. आर्थिक बहिष्काराचा हेतु| महंमदानें मक्का ताब्यात घेतांच असा दंडक केला कीं, कोठल्याही काफिरास पाकस्तानच्या देशांत पायच टाकू दिला जाणार नाहीं. आर्थिक बहिष्काराचा कडक रीत्या अवलंब करून सर्व जनतेस नवीन धर्म पाळणे त्याने भाग पाडले. काबामधून सर्व मूर्तीचे उच्चाटन करण्यांत आले व तेथे महंमदाच्या देवाची स्थापना करण्यांत आली. ५९
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/56
Appearance