Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य मुळे अरबांना सनातन धर्मातील सर्वश्रेष्ठ तत्त्वांचे सारच मिळाले. अवताररूपाने प्रतीत होणारा व चराचर विश्व व दिव्य शक्ति यांहून प्रभावी अशा एका परम ईश्वरावरील श्रद्धा हाच तो वारसा निधी होय. हेंच इस्लामचे सार. याच आधारावर नवधर्माची ध्वजा फडकवण्यासाठीं महंमदाचा अवतार. अरबांच्या अध्यात्मबुद्धीचे हेच सार होय. इस्लामचे सार महंमदाच्या बुद्धीने शोधून काढलें नाहीं किंवा त्याचा त्याला साक्षात्कारही झाला नाही, तर ते इतिहासाचा वारसा म्हणून अरवांना प्राप्त झाले होते. या संपत्तीचे महत्त्व ओळखून त्याची जाणीव आपल्या देशबांधवांना करून देण्यांतच महंमदाचे माहात्म्य आहे. मक्का-पंथापंथांचा संगम-- एकमेव व सर्वश्रेष्ठ परमेश्वराच्या कल्पनेचा लाभ अरबांनी मिळविला होता; परंतु संवयीमुळे अनेक देवतांची उपासना ते करीत असत. पूर्वीच्या धर्माचा मिळालेला दायभाग फलदायी होण्यासाठी रूढ उपासनामार्ग सोडणे आणि त्यासाठी अगदी जोराचा प्रयत्न होणे अवश्य होते; आणि या प्रयत्नाच्या हल्ल्याला अत्यंत सुरक्षित ठाणे मक्का हे होते. विशिष्टांनाच स्वातंत्र्य आणि टोळ्यांमधील यादवी यांमध्ये मक्केला तडजोड घडवून आणण्यांत आली. सर्व बाजाराची उतारपेठ मक्का होती. अनेक प्रांत असलेल्या राष्ट्राचे आर्थिक हितसंबंध एकच असले म्हणजे आध्यात्मिक एकरूपता निर्माण होते. तिचे साक्षात् दर्शन मक्केत घडत होते. दूरच्या भागांतील सर्व टोळया मक्केला व्यापारासाठी येत, त्या वेळी काबा येथे येऊन मशिदींत प्रार्थना करून त्या जात. तेथे प्रत्येक टोळीचे निशाण असे. माणसांच्या, गरुडांच्या, सिंहादिकांच्या मूति व सुमारे तीनशे साठांहून अधिक इतकी चित्रे तेथे होती. कोरेश टोळीनें मक्केच्या व्यापाराची मालकी आपणाकडे मिळविली होती व शेम या कुटुंबाने मशिदीचा ५८