Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ऐतिहासिक व सामाजिक पाश्र्वभूमि अद्वैतनिष्ठा या सर्व गोष्टी भौगोलिक परिस्थितीमुळेच निर्माण झाल्या असे म्हणावयास हरकत नाहीं. भोंवतीं दडपशाही किंवा 'परचक्राने त्रस्त देश असूनही अरबस्थानाने आपले स्वातंत्र्य अबाधित राखले होते. ईजिप्त व इराण यांतील छळ सहन करणारे लोक, किंबहुना ख्रिश्चन प्रांतांतील लोकही आपणांस हवे असलेले विचार व आचार यांचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठीं अरबस्थानच्या आश्रयास येत. इराणने असीरिआचे साम्राज्य जिंकलें त्या वेळी किंवा बॅबिलोनियाचा धर्म मॅगीने नष्ट केला त्या वेळी सँबिअन भिक्षु खगोलशास्त्राचे ज्ञान घेऊन अरबस्थानच्या आश्रयास येऊन राहिले. पुष्कळ ज्यू लोकही असीरिआच्या हल्ल्याच्या वेळी येथे येऊन राहिलेच होते. जॉन बॅप्टिस्टसह सर्व हिब्रू अवतारी पुरुषांचा निवास अरबस्थानच्या अंतर्गत भागांतच होता. असीरिआवरील अन्यायाचा सूड अलेक्झेंडरच्या स्वारीने घेतला आणि झोरोस्टरचे कट्टे शिष्यही अरबस्थानच्या स्वतंत्र वातावरणांतच राहू लागले. तेथे त्यांचे व बॅबिलोनिअनांचे सख्य घडलें. सर्व धर्माचं सार-- पौर्वात्य गूढवादी पंथांतून निर्माण झालेले ज्ञानवाद, सदसदेकरूपवाद, ग्रीक आणि ख्रिश्चन तत्त्वज्ञान या सर्वांचा सारखा विकास अरबस्थानच्या स्वतंत्र वातावरणांत होत होता. नेस्टोरिअन, जंकोवाइट आणि युटिशिन पंथाप्रमाणेच कॅथॉलिक सनातनीही अरबांचे आतिथ्य चाखण्यास त्यांचेच ‘पांतीकर' झाले. मूतपूजेच्या जंजाळापेक्षा अरब तत्त्वज्ञानांतील साधेपणाचा परिणाम होऊनच असे घडले असे म्हणावयास हरकत नाहीं. 'परदेशी' होण्याचे स्वातंत्र्य लाभल्यामुळे या निकट आलेल्या भिन्न पंथांना आपणांमध्ये सामान्य गोष्टी कोणत्या आहेत, हे पाहतां आलें. सहिष्णुतेच्या प्रशांत वातावरणांत त्यांच्या मतांतील गोंधळ निमाला, जुलुमाने बाटविण्याचा दुराग्रह शमला आणि आपापलीं धर्मतत्त्वे या पाहुण्यांनी एकमेकांना सांगितल्या ॐ ॐ ५७