इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य गेले होते. कडक धार्मिक विधी आणि आचार यांनीं धर्माचे स्थान बळकाविले होते. ढोंगी। समारंभांनीं भक्तीची हकालपट्टी केली होती. शव्दप्रामाण्याने निष्ठेचा छळ चालविला होता देवदूत, संत आणि त्यांचे शिष्यगण यांच्या मेळाव्यांत ईश्वर अश्य बनला होता. म्हणूनच अद्वैताची घोषणा करणाच्या नवीन सहिष्णु धर्माचे दलित व त्रस्त अशा बहसंख्य जनतेने स्वागत केले. बौद्धिक दिवाळखोरी, आध्यात्मिक गोंधळ व सामाजिक अव्यवस्था आणि धकाधकी यांच्या काळांत सामान्य जनतेला हव्या असलेल्या त्रजु निष्ठेचा आधार मिळाला. म्हणूनच या खवळलेल्या समुद्रात जनतेचे तारू सुखाने आपला मार्ग काढू लागलें. दलितांचा आधार अद्वैताची भूक अरब-वैश्य वर्गासच लागली होती. शेजारच्या संस्कृती सडून नष्टप्राय होण्याच्या वेळेस हा वर्ग युद्ध आणि दुष्ट समजुती या घातुक गोष्टींपासून अलिप्त होता व आर्थिक दृष्ट्या तो समृद्धही झाला होता. एकच एक परमेश्वर आहे या विचारसरणीच्या प्रसाराने लष्करी अधिराज्याचा पाया घातला; आणि त्या अधिराज्याच्या सर्व क्रियांचे एकीकरण करण्यांत आले. या एकीकरणामुळे नवीन सामाजिक घडी निर्माण झाली. या संस्कृतीचे मंदिर जुन्या संस्कृतीच्या अवशेषावर भव्य व उत्तुंग असे उभे राहिले. धार्मिक छळाने त्रस्त झालेल्या अनेकांना हा आश्रय आकर्षक वाटला असल्यास नवल ते काय? इस्लामी धर्माच्या संरक्षणाखालीं जे जे आले त्या सर्वांना सदसद्विवेक बुद्धीचे संपुर्ण वातंत्र्य मिळाले; किंबहुना त्रस्त व दलित यांच्या आश्रयासाठी या नवधर्माचा अवतार झाला असेच सर्वास वाटले. ख्रिश्चन लोकांना आसरा--- सर्वसंग्राहकत्व, विश्वकुटुंबत्व, लोकशाहीप्रधान धोरण आणि
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/53
Appearance