पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य हिंदुस्थान, इराण, सीरिया, पॅलेस्टाइन या प्रदेशांशीं ज्या मार्गानी व्यापार होत असे, त्याच मार्गाशीं अरबांचे हितसंबंध निगडित झाले होते. आफ्रिका आणि आशिया यांच्यांतील प्रारंभींच्या खुष्कीच्या व समुद्रावरील व्यापारी वाटा अरबस्थानच्या उत्तर व दक्षिण भागांतून होत्या. अज्ञात वाळवंट चुकविणे एवढाच त्यांतील हेतु. परंतु जुलुमी बायझंटाइनच्या अतिरिक्त करवाढीमुळे व स्थानिक अधिकारी वर्गाकडून होणारी पिळवणूक टाळण्यासाठी व्यापारी वर्गानें अरबस्थानच्या आतिथ्यपूर्ण अंतर्भागांत प्रवेश केला. लुटालुटीनंतर आरंभीं आरंभीं अरबांच्या लुटीलाही कांहीं विशिष्ट नियम व नीति होती. परंतु हळुहळू त्यांच्या हें ध्यानीं आलें कीं, लुटालूट करण्यापेक्षां व्यापार अधिक फायदेशीर होईल. कोरेश या टोळीने सर्वात आधी आपला धंदा बदलला. तांबड्या समुद्राच्या कांठीं त्यांची वसाहत होती, पुढे अबिसिनियाच्या व्यापाराची मालकी त्यांनी लवकरच संपादिली. परंतु त्याच्यापूर्वीच आशियाची व्यापारी वाहतूक त्यांच्याकडे आली होती. ख्रिस्ती शतकाच्या आरंभींच्या कांहीं शतकांत कोरेश टोळ्यांची राजधानी मक्का म्हणजे सर्व दक्षिणोत्तर व्यापार मार्गाचे केंद्रस्थान ही होती. अरेवियन समुद्रावरील यामेन बंदरांत कोरेशांचे काफले हिंदी वस्तंचा पुरवठा करून घेत असत, हल्लीच्या एडनच्या आसपास त्यांचे उंट अफ्रिकेतील प्रसिद्ध अबिसिनियाच्या संपत्तीने अधिक भारावून जात. दमास्कसच्या बाजारपेठेत धान्य व इतर निमत वस्तू आणि अत्तरे, मोतीं, हिरे व हस्तिदंत यांची देवाण घेवाण होत असे. या फायदेशीर देवाणघेवाणीमुळे सर्वत्र समृद्धि झाली. पूर्व पश्चिम व्यापार सुरू होतांच ही समृद्धि अमर्याद झाली व कोरेशच्या टोळ्यांच्या महत्त्वाकांक्षाही अधिकाधिक वाढू लागल्या. ५४