इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य हे भयंकर वाळवंट आले आहे; व आपल्या इतर बंधूना समृद्ध व सुपीक जमिनीचा वारसा मिळाला आहे. म्हणून ज्या वारसा-संपतीस आपणास मुकावे लागले आहे, ती बळेच मिळविण्यास कांहींच हरकत नाही, अशीही प्रवृत्ति त्यांच्यामध्ये होती. व्यापाराची सूक्तासूक्त साधनें महंमदाच्या आधीं सहा शतकें होऊन गेलेल्या इतिहासकारासही अरब लोक लुटालूट व व्यापार हे दोन फायदेशीर धंदे करतांना आढळून आले. त्यांचा मूळचा धंदा मेंढ्या व घोडे पाळणे हाच होय. सामाजिक उत्क्रांतीच्या प्रथमावस्थेत वरील दोन धंद्यांत फारच अल्प भेद असे. व्यापारी स्वस्त किंमतींत माल खरेदी करतो व अधिकांत अधिक किंमत देईल त्यास तो त्याची विक्री करतो. खरेदीची किंमत जितकी कमी तितका नफा अधिक. अर्थात् व्यापाराचे हें मूल तत्त्व मान्य केलें कीं अधिकांत अधिक नफा मिळविण्यासाठीं जरूर तसे वागण्याचा व्यापा-यांचा हक्क अगदी सरळच कायदेशीर होतो. स्पर्धेमुळे त्याला किंमती कमी ठेवाव्या लागतात. म्हणून स्पर्धा नाहींशी करण्याचा उपाय म्हणून त्या कालांत तो आपल्या प्रतिस्पध्र्यास लुबाडतो. त्यामुळे बलिष्ठ असेल त्याला सर्व मालमत्ता प्राप्त होते. शिवाय दळणवळणाच्या मार्गावर व बाजारपेठांवर आपली संपूर्ण सत्ता चालविण्या-टिकविण्यासही हाच मार्ग परिणामकारक असतो. लढाऊ मनोवृत्ति ह्या मार्गाचा अवलंब प्रारंभीच्या काळात सर्वत्र होत असे, असे आधुनिक व्यापा-यास सांगितले तर तो स्तिमितच होईल. * प्रामाणिकपणा हेच उत्तम धोरण' या न्यायानुसार आधुनिक व्यापारी आपला धंदा सात्त्विकपणे चालवीत असतो. पण त्याची स्थापना वर लिह ५२
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/49
Appearance