प्रकरण तिसरें ऐतिहासिक व सामाजिक पाश्र्वभूमि मुसलमानी धर्म ( शांतिधर्म ) हा कांहीं महंमदाने निर्माण केला नाहीं. किंबहुना इतर कोणताही धर्म ज्या संस्थापकांनीं तो स्थापिला असे म्हणतात, त्यांनी तो निर्माण केलेलाच नसतो. एकाद्या व्यक्तीस साक्षात्कार होऊन अभिनव धर्माचा उदय अकस्मात् झाला असे म्हणतात, हेही पण सत्य नाहीं. इतर सर्व धर्माप्रमाणे मुसलमानी धर्मही त्या काळच्या परिस्थितीचा परिपाकच होय; किंवा त्या परिस्थितीमुळेच त्याचा विकास शक्य झाला. स्वातंत्र्याची लालसा अरबस्थानच्या रहिवाश्यांनी देशाच्या भौगोलिक परिस्थितीमुळे उत्पन्न झालेल्या विशिष्ट जीवनपद्धतीमुळेच आपले स्वातंत्र्य अबाधित राखले होते. नाहीं तर त्यांचे वसतिस्थान म्हणजे मोठमोठ्या जयिष्णु राष्ट्रांची भयावह पाऊलवाटच होती. त्या वाटेनेच असिरीया, इराण, मॅसिडोनिया व रोम येथील सैन्ये आपल्या लष्करी हालचाली करीत असत. परंतु स्वातंत्र्याची अदम्य लालसा व प्रवासी जीवन यांचा परिणाम होऊनच की काय अरब लोकांच्या टोळ्या-टोळ्यांमधून अंतःकलह अविरतपणे चालू असत. बाकीच्या जगाला पूर्णपणे पारखे असल्यामुळे कोणाही परस्थास ते शत्रू समजत असत. देशाच्या दारिद्रयामुळे तर ही वृत्ति अधिकच बळावली होती. या दोन गोष्टीच सर्व अरबी कायदे व नीतिमत्ता यांच्या मुळाशी आहेत. त्यांचा विश्वास असा कीं, बहिष्कृत इस्लामच्या वंशांत दुर्दैवाने आपला जन्म झाला असल्यामुळे आपल्या वांटयाला ५१
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/48
Appearance