या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य दहा शतकें व तीन खडे भांडवली उत्पादनाच्या योगाने युरोपांतील मध्ययुगीन रानटी गोंधळ नाहींसा केला. ख्रिश्चन देवकल्पना आणि कॅथॉलिक पंथाची मक्तेदारी यांच्याशी लढून भांडवलदारी पद्धतीने बुद्धिवादी प्रभावी शस्त्रांनीं जय मिळविला. या शस्त्राची परंपरा अशी : प्रथम हे ग्रीक ऋषींनी वापरले. पुढे अरबांनी हे शस्त्र संरक्षिलें एवढेच नव्हे तर अधिक उज्ज्वल आणि प्रभावी केले. अरबांच्या हातून हा ठेवा आधुनिक संस्कृतीच्या संस्थापकांच्या हाती आला. हे ऐतिहासिक युद्ध अरबांनी धर्मछत्राखाली उभे राहून सुरू केले आणि सुमारे दहा शतकें तीन खंडांत चालल्यावर युरोपांतील अठराव्या शतकांतील भांडवलशाही क्रांतीने ते जिंकले. ५०