Jump to content

पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्ये प्रेषितांचे उदात्त गुण धर्मवेड्या लोकांची लुटालूट म्हणजेच इस्लामचा इतिहास असे ज्यांना वाटते, त्यांना काय म्हणावे हेच कळत नाहीं ! कारण ** अल्ला हो अकबर' च्या गर्जनेत कुराण आणि तरवार यांपैकी एकाची निवड करावयास इस्लामने-महंमदाने सांगितले असे जे मानतात त्यांना हे माहीत तरी नसावे किंवा ते तिकडे दुर्लक्ष तरी करीत असावेत, कीं महंमदाच्या पाठोपाठ त्याच्या गादीवर आलेल्या ईश्वरप्रेषितांनी ऐहिक विजयावरच भर दिला. ते सर्व औदार्य, पावित्र्य आणि भूतदया इत्यादि गुणांमध्ये मानवी समाजावर तुटून पडणा-या अलेंरिक, चेंगीझखान वगैरे रानटी लोकांपेक्षां किती तरी श्रेष्ठ होते. त्यांच्या भक्तीभोंवतीं रूढीचे वलय असेल; परंतु ते दांभिक नव्हते. व्यवहारज्ञान आणि औदार्य यांनी त्यांच्या धर्मवेडाला हळुवारपणा आणला होता. ते महत्त्वाकांक्षी होते; पण पूर्णपणे निःस्वार्थी होते. देवभक्तीच्या नावाखालीं ते आपली धनभक्ति झांकीत नव्हते. धर्मरक्षक अबुबकर याच्याइतकी भक्तिवान्, उदात्त, कार्यनिष्ठ व नग्न व्यक्ति इतिहासांत शोधू जातां सांपडणार नाही. त्याने सेनेला दिलेला संस्मरणीय आदेश पहा :-

  • न्यायी बना; अन्यायाने वागणारे कधीच उन्नत होत नाहींत.. धैर्यशाली बना; मरण पत्करा; पण शरण जाऊ नका. दया दाखवा; वृद्ध स्त्रिया आणि मुले यांना मारू नका; फळझाडे, धान्य आणि पशू यांचा नाश करू नका. शत्रूला देखील दिलेले वचन पाळा ! आणि जगापासून निवृत्त झालेल्यांना यत्किचितही त्रास देऊ नका !" | या आज्ञा मनापासून सोडल्या व पाळल्या जात म्हणून तर अप्रति-- हतपणे विजय मिळत असत.

अरब स्वारांचे सर्वत्र ‘स्वातंत्र्यदाते' म्हणून स्वागत होत असे. महंमदाची क्रांतिकारक शिकवण निष्ठेने तंतोतंत पाळणारे आणि सुज्ञ खलिफांच्या आदेशाप्रमाणे आचरण करणारे लोकांच्या सहानु ४२