इस्लामी संस्कृतीचे क्रांतिकार्य पहिल्या शतकाच्या शेवटी हे धर्मसंस्थापकांचे ' सेनापती' जगांतील सर्वात सामर्थ्यवान् सत्ताधीश होते. सर्वात मोठा चमत्कार| चमत्कार केल्यामुळे धर्मसंस्थापकाची पदवी बहुतेक सर्वांना मिळाली आहे. या खुणेवरूनच जर धर्मसंस्थापकत्व ओळखावयाचे असेल तर महंमदाला सर्वात मोठा धर्मसंस्थापक मानले पाहिजे. इस्लामचा प्रसार हाच त्याचा सर्वांत मोठा चमत्कार. टूजन व ऑगस्टस् यांनी ज्याच्या मर्यादा वाढवल्या ते रोमचे साम्राज्य ७०० वर्षांच्या मोहिमांचे फल होय. परंतु तेही एकाच शतकांत अरबी साम्राज्याने मिळवलेल्या राज्याचे मानाने लहानच म्हटले पाहिजे. अलेक्झेंडरचे साम्राज्यही खलिफांच्या राज्याच्या अंशाइतकेच भरेल. कारण, ज्या इराणी साम्राज्याने रोम साम्राज्याशी १००० वर्षे टक्कर दिली ते साम्राज्य अल्लाच्या तरवारीपुढे अवघ्या १० वर्षात वांकलें. इस्लामच्या उदयाचा हा नवलपूर्ण चमत्कार इतिहासकारांनीं वर्णन करण्यासारखा नाहीं काय ? एका शतकांतील क्रांति " अरब लोकांत राज्यकत्र्यांच्या गुणाचे बीजांकुरही दिसत नव्हते. ना सैन्य, ना राजकीय आकांक्षा. अरब हे कवी होते, नाटककार होते, व्यापारी होते, युद्ध-निपुण तर होतेच होते. पण, मुत्सद्दी ? छे ! त मुत्सद्दी कधीच नव्हते. त्यांच्या धर्मातही कांहीं स्थैर्योत्पादक किंवा ऐक्यकारक असे गुण नव्हते. प्रारंभी अनेक देवता, मूर्ती ते मानत असत पण एका शतकानंतरच ते सर्व जगांत सामर्थ्यवान्, संपन्न असे बन त्यांनीं सीरिया व इजिप्त जिंकला; इराण आत्मसात केला; पश्चिम तुर्कस्थान व पंजाब यांचा कांहीं भाग त्यांनी आपल्या पंजाखाली घातला आफ्रिकेंतून बायझंटाइन्सची हकालपट्टी यांनीच केली. स्पेन, विास
पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/35
Appearance