पान:इस्लामी संस्कृतीचें क्रांतिकार्य.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्घात त्मिक अधिराज्यता होय; व यामुळे महंमदी धर्माकडे आपण अधिकच उपेक्षेने पाहतों हे सत्य आहे. पैगंबराच्या तत्त्वज्ञानाची सध्यांची माहिती ही अत्यंत अपुरी व चुकीची आहे. सामान्य सुशिक्षित हिंदूस इस्लामचे क्रांतिकारक महत्त्व माहीत असतच नाही. त्याचप्रमाणे त्या क्रांतीच्या सांस्कृतिक परिणामांची जाणीवही असत नाहीं. हिंदंच्या या कल्पनांचा राजकीय धोरणावर परिणाम होणार नसता तर त्या हास्यास्पद म्हणून सोडूनही देतां आल्या असत्या; पण शास्त्रज्ञान, ऐतिहासिक सत्याची चाड व राष्ट्रीय एकजूट या तीनही कारणांसाठी, या खुळचट कल्पनांचे निर्मूलन करणे अवश्य आहे; व इस्लामी संस्कृतीचे योग्य गुणदोष जाणणे हे सध्यांच्या हिंदुस्थानच्या स्थितीत अत्यंत अवश्य आहे. इतिहासकाराची ग्वाही| सुप्रसिद्ध इतिहासकार गिबन म्हणतो, "इस्लामचा उदय आणि विकास ही एक अत्यंत संस्मरणीय अशी क्रांति झाली आहे. तिचा जगाच्या इतिहासावर चिरकाल टिकेल असा नवा ठसा उमटला आहे." अरबस्थानच्या उजाड वाळवंटांतून वर आलेल्या व नवीन धर्माच्या चेतनेने स्फूति पावलेल्या लहान लहान फिरत्या टोळ्यांनी दोन प्रचंड व बलाढ्य साम्राज्यांना अतिशय जलद मार्गे हटले आहे हें विश्वसनीयही वाटणार नाहीं. तरवारीच्या जोरावर शांतीचा संदेश सर्वत्र पसरून ‘धर्मसंस्थापक' ही पदवी एकटया महंमदानेच मिळविली आहे. त्याच्यानंतर अवघ्या पांच-पन्नास वर्षात त्याच्या अनुयायांनी त्याचे ते चांदाचे निशाण एका बाजस हिंदुस्थानच्या किना-यावर व दुस-या बाजूस अटलांटिक महासाग'राच्या किना-यावर रोवले. दमास्कस येथील प्रारंभींच्या खलिफांचेही राज्य एवढे मोठे होते की, त्याच्या एका टोंकापासून दुस-या टोंकास जाण्यास द्रुतगतीच्या उंटास देखील पांच महिने लागत. हेगीराच्या ३५